राज्यातील आरोग्य सेवेचे तीन तेरा वाजले आहेत .

राज्यातील आरोग्य सेवेचे तीन तेरा वाजले आहेत . याची प्रचिती पुन्हा एकदा अहमदनगर जिल्यातील पुणतांबा गावात आली आहे .
ग्रामीण रुग्नालयाच्या आवारात रुग्णवाहिका उभी आहे . पण ती काहीच कामाची नाही . परिणामी रुग्णांचे हाल कधी थांबणार हा प्रश्न उभा ठाकला आहे .
वाल्मिक जोगदंड शनिवारी मध्यरात्री आपल्या पत्नीला बाळंतपणासाठी पुणतांबा ग्रामीण रुग्नालयात घेऊन गेले असता तिथे रात्रपाळीला उपस्थित असलेले कर्मचारी यांनी रूग्णाला हलविण्यास सांगितले , ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात अँब्युलन्स असूनही १०८ ला फोन करावा लागला. वाल्मिक ने फोन केला असता . “गाडी राहात्यात उभी आहे यायला एक दीड तास लागेल ‘ असे सांगितलेल्या चालकाने एक तासात १०८ घेऊन आला , यात एक डॉक्टर व चालक हे दोघे रुपाली व वाल्मिक जोगदंड पतिपत्नी व वाल्मिक ची आई असे तिथे मागे बसले राहता येथे जाण्यास निघाले . अर्ध्या रस्त्यात वाल्मिकीच्या बायकोने मुलीला जन्म दिला .
विशेष म्हणजे सरकारने आरोग्यसेवेचा दोन एकमेकांना पूरक सेवा सुरु ठेवल्या आहेत . त्यांनिमित्ताने त्यांच्या जबाबदाऱ्याही वेगवेगळ्या आहेत . या सर्व जबाबदारी ढकलण्याचे पर्याय असल्याचे अनुभवाला येते .या घटनेची चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांना संपर्क केला असता ते ” नॉट रिचेबल ” होते .
एक प्राथमिक आरोग्य सेवा हि जी प च्या अधिकार क्षेत्रात आहे आहे , दुसरी ग्रामीण रुग्णालयअशी व्यवस्था आहे. जी जिल्हा शल्य चिकित्सक यांचे अधिकार क्षेत्रात आहे . आणि दोन्हीची दुरावस्था आहे . ग्रामीण रुग्नालयात कर्मचारी तुटवड्याचे रडगाणं सुरु आहे तर प्राथमिक आरोग्य केंद्रात साधन सुलभतेचा अभाव आहे . रुग्णालयाच्या दारात रुग्णवाहिका शोभेसाठी उभ्या आहेत ,प्रसंगी म्हणण्यापेक्षा नेहमीच १०८ बोलवली लागते . तिची वेगळी कहाणी आहे . ते पन्नास कि मी लॉगशीट भरण्यासाठी फेरा मारून येण्याला भर देतात . एकूणच सामान्य नागरिकांच्या विचारापलीकडची हि दुहेरी कुचकामी व्यवस्था जीवावर बेतणारी आहे .
घडलेल्या प्रकारात वाल्मिक ने केलेले आरोप गंभीर आहे . आता वेळ प्रशासनाची आहे निर्णय घेण्याची व राज्यातील आरोग्यसेवा लोक उपयोगी कशी करता येईल याची यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची ….

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thing power.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized with PageSpeed Ninja