सरकार कुठे आहे ? मंत्री ,संत्री जागे होतील का ?
या बातमीत दाखवलेली घटना हि काल्पनिक नाही . मणिपूरचीही नाही . आपल्या राज्यातील निसर्गाच्या कुशीतील तुमच्या माझ्या सारख्या मानवजातीच्या प्राण्याची आहे . असं मी मुद्दाम म्हणतोय कारण या प्राण्यावर सत्ता गाजवणे . त्यांच्या मताने सत्तेत जाऊन बसून त्यांचे मालक होत आपल्या कुटुंबाचा उद्धार करणारे सर्व निर्णय सहजतेने घेणे . याला लोकशाही असे नाव देत आपण या देशाचे ,राज्याचे , मतदार संघाचे मालक आहोत असे मानणारे सर्व विश्वस्त यावर कधी गंभीर होतील ?
आणखी किती बळींची वाट आपल्या साठी उभारलेली नोकरशाही ( पाच अंकी पगार घेणारे ) सनदी अधिकारी काय करतात ? त्यांना या गोष्टी लक्ष्यात येत नाही का ? असे असेल तर हि व्यवस्था आम्ही का पोसत आहोत ? हे प्रश्न मला पडतात ते पाहिजे .