नागरिकांची सनद कोण तपासणार ?

सामान्य नागरिकाला प्रशासनाची माहिती व्हावी तसेच प्रत्येक सरकारी कार्यालयात कार्यरत असलेले कर्मचारी महिन्याकाठी किती पगार घेतात ? तसेच कार्यालयीन रचना कशी आहे ? हि माहिती प्रत्येक कार्यालयाच्या वेब साईट वर सार्वजनिक करणे अनिवार्य आहे . दुर्दैवाने अहमदनगर जिल्हाधिकारी यांचे वेबसाईट वर काही ठराविक विभागाने आपले चार्टर ४ नियमित व अद्ययावत ठेवले आहे . माझ्या बऱ्याच सहकार्याना हा प्रकार काय आहे हे देखील माहित नाही . ते राजकीय धुण्याभांड्यात व्यस्त आहेत . लोकशाही मध्ये जनता हि मालक आहे , व ती आपल्या नोकरांना ( नावाला लोकसेवक म्हणवून )घेणारांना किती मेहनताना देते हि माहीती सहज उपलब्ध होणे अपेक्षित आहे . यासाठीच नागरिकांची सनद हा प्रकार अस्तित्वात आला . यातही पळवाट शोधली गेली . हि माहीती संकेतस्थळावर म्हणजेच वेबसाईट वर टाकण्याचा नियम बनवला . ती हि अद्ययावत करायला नोकरांना वेळ नाही . अधिकारी दिवसाला बदलणारे मंत्री संत्री यांचा प्रोटोकोल सांभाळण्यात व्यस्त आहे . https://ahmednagar.nic.in/en/rti2/

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thing power.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *