प्रजापिता ब्रम्हाकुमारी नारी शक्ती पुरस्काराने सौ. लताताई भामरे(वहाडणे)सन्मानित…
प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय नाशिक यांचे वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त मुली आणि महिला शिक्षण आणि सबलीकरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्यरत राहिलेल्या समाजसेविका सौ. लताताई भानुदास भामरे (वहाडणे) यांना कोपरगांव येथे राजयोगिनी ब्रम्हाकुमारी सरला दिदी यांचे शुभेच्छा सन्मानित करण्यात आले आहे.
कोपरगांव येथील प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय केंद्रावर विशेष समारंभात कोपरगांव तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यरत महिलांना ब्रम्हाकुमारीज् नारी शक्ती सन्मानाने गौरवण्यात आले.
या कार्यक्रमास माजी आमदार सौ. स्नेहलताताई कोल्हे,जिल्हा बॅंकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे, सौ. सुधाभाभी ठोळे,शीतलताई वाबळे, रश्मीताई जोशी, मनजीतकौर पोथीवाल, रेखाताई उंडे, अनुपमाताई बोर्डे, सौ. स्वातीताई कोयटे, सिमरनताई खुबाणी, संजीवनीताई शिंदे, मंगलताई वल्टे, पुजाताई शर्मा, रत्नाताई पाटील यांचेसह राजयोग अध्यात्मिक ध्यान केंद्राचे साधक, साधिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाॅल,सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सन्मानपत्रावर महिलांच्या उत्थानासाठी केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख असून त्यावर राजयोगिनी ब्रम्हाकुमारी वासंती दीदीजी यांची यांची स्वाक्षरी आहे. साप्ताहिक नाशिक परिसरचे या उपक्रमास सहकार्य लाभले आहे.
सौ. लताताई भामरे या डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्या मंदिर, कोपरगाव सेवानिवृत्त प्राचार्या आहेत.शिक्षिका ते प्राचार्य या काळात मुली आणि महिला शिक्षण आणि सबलीकरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असून कन्या शाळेच्या मुलींसाठी तीन मजली सुमारे ३५ लक्ष रुपयांचे प्रसाधनगृह उभारणीत पुढाकार व योगदान दिले आहे.
सौ.लताताई भामरे या भारतीय किसन संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक दिवंगत वसंतराव (अप्पा) वहाडणे (पुणतांबा) यांच्या कन्या आहेत.त्यांचे सुपत्र अभिषेक हे उच्च विद्या विभूषित असून नामांकित कंपनीत उच्च पदावर आहेत.
सौ. लताताई भामरे यांनी सेवानिवृत्ती नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्र सेविका समिती माध्यमातून महिला विषयक धार्मिक आणि संस्कार विषयक उल्लेखनीय कार्य करत आहे. तसेच त्या सूर्यतेज संस्था कोपरगावच्या सल्लागार समिती सदस्या आहेत.त्यांना मिळालेल्या नारी शक्ती सन्मानाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.