‘सूर्यतेज’ संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण…

आषाढी एकादशी आणि सूर्यतेज संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त स्वच्छता-जलशक्ती-वृक्षारोपण आणि पर्यावरण अभियान अंतर्गत सैनिकी मुलांचे वसतिगृह येथे आंबा, बेल रोपांचे वृक्षारोपण करून पालकत्व दिले आहे.

या प्रसंगी सूर्यतेज संस्थापक व वनश्री पुरस्कार सन्मानित सुशांत घोडके, वसतिगृह अधिक्षक धन्यकुमार सरवदे,अॅड.श्रध्दा जवाद, अनिल अमृतकर, अतुल कोताडे, शिरिष धनवटे,सौ.वासंती गोंजारे, गोविंद जवाद, परेश उदावंत,नंदकिशोर सरोदे यांचे सह सूर्यतेज सदस्य,विद्यार्थी उपस्थित होते.

सूर्यतेज संस्थेची स्थापना आषाढी एकादशी दिवशी करण्यात आली आहे. संस्थेच्या माध्यमातून सूर्यतेज संस्थापक स्वच्छतादूत सुशांत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली २३ वर्षापासून शैक्षणिक, कला, सांस्कृतिक, सामाजिक,वृक्षारोपण ,वस्तु वाटप या सारखे उपक्रम लोकसहभागातून आणि संस्थेच्या सदस्यांचे सहभागातून आदर्शवत राबविण्यात येत आहे.

सूर्यतेज संस्था, कोपरगांव विविध उपक्रम सन २००१ पासून
★ शैक्षणिक→ कार्यात शालेय गरजू विद्यार्थ्यांना मोफत वही वाटप, गणवेश वाटप, चप्पल वाटप, अनाथांना मदत कार्य, गुणवंत शोध स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.

★ सामाजिक→ भारतीय सैन्य दलातील जवानांचा तसेच शहीद जवानांच्या परिवाराचा सन्मान, नैसर्गिक आपत्ती प्रसंगी मदत कार्य, उपेक्षित व निरक्षर यांना शासन योजनांची माहिती देणे, बचत खाते, विमा संरक्षण प्रबोधन, मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येते.

★ कोपरगांव फेस्टिव्हल→ दीपावली-पाडवा निमित्त ‘घर तेथे रांगोळी स्पर्धेचे भव्य आयोजन, समुहनृत्य सादरीकरण, गंमत-जंमत मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.

★ कला, साहित्य, नाट्य → चित्रकला स्पर्धा,भेटकार्ड स्पर्धा, चित्र प्रदर्शन, प्रत्यक्ष निसर्ग चित्र स्पर्धा, मराठी भाषा दिन, नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा, स्वर-संगित शिक्षण, नाट्य व एकांकिका स्पर्धेत सहभाग असतो.

★ स्वच्छ भारत अभियान → संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान अंतर्गत प्रबोधन फलक, राष्ट्रपिता महात्मा गांधी ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत शाळांना मोफत कचरापेटी वाटप, कचरा कुंडी असलेली ठिकाणे सुशोभिकरण करणे, मोफत कचरा संकलन पेटी सेवा, श्रीसाई पालखी रस्ता (कोपरगांव ते शिर्डी) लोक सहभागातून स्वच्छता अभियान सन २०१४ पासून राबविण्यात येते.

★ वृक्षारोपन व पालकत्व → सूर्यतेज संस्था व संस्थेचे सदस्य महाराष्ट्र शासन वनविभागाचे ‘महाराष्ट्र हरितसेना’ सदस्य आहे. पर्यावरणास उपयुक्त रोपांची निवड करून सुमारे ७२ ठिकाणी वृक्षारोपन व पालकत्व अभियान सन २०१२ पासून सुरु आहे.

★ विशेष सन्मान→
🏆 प्रथम पारितोषिक – महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग आयोजित लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव २०१६ मध्ये सादर ‘शासन योजनांची साक्षरता’ देखावा…
🏆 द्वितीय व वैयक्तिक पारितोषिक – महाराष्ट्र शासन राज्य नाट्य स्पर्धा-२००७, संस्थेच्या सदस्यांना एकांकिका, बालनाट्य स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिके, विविध सामाजिक उपक्रमांचे सन्मानित करण्यात आले आहे.

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thing power.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *