लेकीच्या विवाह सोहळ्यात सामाजिक दातृत्व जपणारा बापमाणूस !
कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथील माझे परममित्र तथा स्नेही संतोष भाऊ चव्हाण पाटील यांच्या लेकीचा विवाह सोहळा दहेगाव येथील द्वारकामाई लॉन्स येथे नुकताच संपन्न झाला. या विवाह सोहळ्यादरम्यान संतोषभाऊंनी सत्कार, स्वागत, शाल, पुष्पगुच्छ अशा गोष्टींना फाटा देत वारी येथील सामाजिक दातृत्व व मानवता हाच धर्म यानुसार कार्य करणाऱ्या राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्टला ११,०००/- (अकरा हजार) रुपयांची रोख स्वरूपात मदत दिली.
मित्रांनो, विवाह सोहळा म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातील आनंदाचा क्षण. याप्रसंगी आपण सर्वच मोठ्या प्रमाणात विविध गोष्टींवर खर्च करत असतो. व आनंद घेत असतो. परंतु; अशाच वेळी समाजात असे काही लोक, घटक असतात की त्यांनाही आपण केलेली छोटीशी मदत ही त्यांच्या जीवनासाठी खूप अनमोल असते. मात्र; बऱ्याचदा मोठमोठ्या विवाह सोहळ्यांमध्ये या गोष्टी दुर्लक्षित असतात. परंतु सामाजिक बांधिलकी जपणारे माझे मित्र संतोष भाऊ चव्हाण यांनी आपल्या लेकीचा अर्थात ऋतुजा हिचा विवाह सोहळामोठ्या थाटामाटात आणि जल्लोषात संपन्न केला. आणि त्याचबरोबर सामाजिक काम करणाऱ्या ट्रस्टलाही मदत केली. या मदतीतून निश्चितच गरजवंतांची सेवा होणार यात शंका नाही. परंतु ज्यांना मदत होईल ते या नवदांपत्याला अंतकरणापासून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. संतोष भाऊंनी आजवर सामाजिक जीवन जगताना निस्वार्थ भावनेतून असंख्य विवाह जमवले आहेत. आणि विशेष म्हणजे सर्वच गुण्यागोविंदाने नांदतही आहेत. हीच सर्व पुण्याई ऋतुजाच्या आयुष्यात महत्वपूर्ण ठरणारी आहे. संतोष भाऊंच्या या योगदानाबद्दल मी व्यक्तीशा त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. व ऋतुजा दीदी व रोहन दादा या नवदांपत्याचे पुढील आयुष्य सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे, उन्नतीचे, आरोग्यदायी जावो हे साईनाथा चरणी प्रार्थना करतो.
याच निमित्ताने एक आवाहन करतो. आपल्या जीवनातील आनंदाच्या क्षणी म्हणजेच विवाह सोहळा, स्वतःचा वाढदिवस, कुटुंबातील सदस्यांचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस या सह ज्यागोष्टीने आपल्याला आनंद होतो. प्रत्येक क्षणी व आपल्या प्रियजनांच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी सामाजिक कार्य करणाऱ्या राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील ट्रस्टला आर्थिक मदत करून निश्चितच गरजवंत निराधाराच्या चेहऱ्यावरील आनंदरुपी आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही.
यावेळी धोत्रे येथील लोकनियुक्त सरपंच प्रदीप भाऊ चव्हाण, माजी सरपंच मनोज भाऊ चव्हाण, वैजापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक शैलेश भाऊ चव्हाण, आमचे बंधू ह.भ.प. विनायकजी महाराज टेके उपस्थित होते.