शिर्डी मतदार संघात आजी माजी खासदाराचे विकासात योगदान काय? संजय खामकर

लोकसभा 2024

शिर्डी मतदार संघात आजी माजी खासदाराचे विकासात योगदान काय? संजय खामकर

महाराष्ट्राचे चर्मकार विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय हरिश्चंद्र खामकर यांनी नुकतीच शिर्डी लोकसभा मतदारसंघातून बळीराजा पार्टी पक्षाकडून नुकताच खासदारकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळी पक्षाचे पदाधिकारी महेंद्र धाडवे, सत्यप्रकाश अर्जुने, जकीर अन्सारी, विनोधन मोर्या अरुण गाडेकर वकील ,आनंद लहामागे ,वकील अविनाश शेजवळ ,सिमोन जगताप आदीसह विविध पदाधिकारी हजर होते याप्रसंगी बोलताना संजय खामकर म्हणाले की शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या विकासात आजी-माजी खासदारांना विकासाची कामे करण्यात अपयश आले असून त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारे विकासाचा अजेंडा नाही खासदार लोखंडे हे निळवंडेचे श्रेय घेऊन पाणीदार खासदार म्हणून मी काम केले हे सांगत आहे तर मग नामदार राधाकृष्ण विखे व माजी महसूल मंत्री थोरात यांचे निळवंडे योगदान नाही का असा सवाल विचारत खासदार वाकचौरे यांचे वय झाले तरी त्यांना सत्तेचा मोह सुटत नसल्याने आपण ही उमेदवारी करत असल्याचे संजय खामकर यांनी सांगितले


खामकर म्हणाले की दोन्ही खासदारांची कामगिरी निराशदायक आहे हे जनतेच्या लक्षात आले आहे दोघांनी लोकसभेत कधी शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्यांच्या प्रश्नावर प्रश्न विचारले नाही एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून ते लोकांची फसवणूक करत आहेत पाणीदार खासदार हा लोखंडेचा ढोंगीपणा आहे दोन्ही खासदार कोरोना काळात कोठे होते जेव्हा लोक अडचणीत होते त्यावेळी आपण जनतेच्या बरोबर होतो असे सांगत आपण खासदार झालो तर शेतकरी विविध प्रश्न खते औषधे शेती अवजारांना सबसिडी बेरोजगारांना रोजगार या परिसरातील लोकांसाठी कारखानदारी असे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आपण खासदारकीच्या माध्यमातून काम करणार असल्याचे सांगत जनता आता परिवर्तन करणार असल्याचे यावेळी सांगितले

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thinking brain power. That is my motivation and capacity of problem solving.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *