पहिल्यांदाच दर्शनासाठी आलेल्या महिलेने केले तहतीस लाखांचे दान

solapur rto women donation

पहिल्यांदाच दर्शनासाठी आलेल्या महिलेने केले तहतीस लाखांचे दान

मंदाकिनी गावसाने या सोलापूरच्या महिला ज्या राज्य परिवहनच्या विभागात नोकरीला होत्या. कुटुंबात एकट्याच असलेल्या या महिलेने आपली संपत्ति म्हणजे त्यांच्याकडे असलेली रोख रक्कम व आपले दागदागिने चांगल्या ठिकाणी दान करावे म्हणून विचार करत असताना. त्या शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला आल्या. इथे आपन केलेल्या दानाचा विनियोग हा समाजासाठी होईल याची खात्री पटली म्हणून त्यांनी त्यांच्याकडे असलेले रोख रक्कमेचा धनादेश व दागिने सी चरणी अर्पण केले. विशेष म्हणजे या महिलेने ज्याना गुरु केलेले आहे. त्यांना सुमारे एक लाख रुपये चांदीचे जेवणाचे ताट भेट दिले होते. पण त्याचा वरपर केला गेला नाही. यामुळे त्या दुखी झाल्या होत्या. याच कारणाने त्यांनी योग्य विनियोग होईल आशा ठिकाणी संपत्ति दान करायची हा निर्णय घेतला.

आज दि. ०३ मे रोजी सोलापूर येथील श्रीमती मंदाकिनी गुरुलिंग गावसाने यांनी श्री साईबाबा संस्‍थानला चेक स्‍वरुपात रक्‍कम रुपये २० लाख व विविध प्रकाचे एकुण २०५.०५० ग्रॅम वजनाचे रक्‍कम रुपये १३ लाख २४ हजार १५८ रुपये किमतीचे सोन्‍याचे दागीने असे एकुण रक्‍कम रुपये ३३ लाख २४ हजार १५८ किमतीची देणगी दिली. त्‍याबद्दल श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने त्‍यांचा श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी शाल व श्रींची मुर्ती देवून सत्‍कार केला. यावेळी श्री साईबाबा संस्‍थानचे प्र. लेखाधिकारी कैलास खराडे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहीदास माळी आदी उपस्थित होते.

या महिलेने साईबाबा संस्थानाला दान दिले. सोबत एक संदेशही दिला आहे. तो म्हणजे साईबाबा संस्थान व्यवस्थेने दान स्वरूपात रोख रक्कम स्वीकारून संस्थानच्या उपक्रमात , प्रकल्पात त्याचा उपयोग करावा. अनेकदा श्रीमंत भाविक हे कुठल्यातरी कर्मचाऱ्यांच्या संपर्कात असतात. त्यांना अनेक भाविक “साईबाबा को चढावा देना है , असे म्हटल्यावर हे कर्मचारी त्यांना इथे दवाखान्याला साहित्य द्या ,प्रसदालयात अमुक वस्तु द्या. शाळेला तमुक वस्तु द्या. असे सल्ले देतात. व भाविकही त्या वस्तु साईबाबा वरच्या श्रद्धेने देतात. या वस्तूंची कदर याच संस्थानातील लोकाना अजिबात नाही. आशा वस्तु कशा निरुपयोगी आहे हे पटवून देणारे कर्मचारीही आहेत. तेव्हा भविकाकडून त्याला आरोग्यासाठी काही द्यायच आहे तर सरल हॉस्पिटल फंडात , शैक्षणिक साहित्यासाठी काही द्यायच आहे तर ते एज्युकेशन फंडात रोख पैसे जमा करून घेतले पाहिजे.

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thing power.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *