श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था सरत्‍या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागता निमित्‍त आयोजित करण्‍यात आलेल्‍या शिर्डी महोत्‍सवाच्‍या दिनांक २५ डिसेंबर २०२४ ते दिनांक ०२ जानेवारी २०२५ याकालावधीत सुमारे ०८ लाखाहुन अधिक साईभक्‍तांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले तर या कालावधीत सुमारे १६.६१ कोटी रुपये देणगी प्राप्‍त झाली असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी दिली.

video from saibaba trust

 गाडीलकर म्‍हणाले,  चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागता निमित्‍त शिर्डी महोत्सवाचे आयोजन दिनांक २५ डिसेंबर २०२४ ते दिनांक ०२ जानेवारी २०२५ याकाळात दानपेटीतून ०६,१२,९१,८७५/- रुपये, देणगी काउंटरव्‍दारे ०३,२२,२७,५०८/- रुपये, पी.आर.ओ. सशुल्‍क पासद्वारे ०१,९६,४४,२००/- रूपये, डेबीट क्रेडीट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक/डिडी व मनी ऑडरव्‍दारे ०४,६५,७३,६९८/- रुपये अशी एकुण १५ कोटी ९७ लाख ३७ हजार २८१ रुपये देणगी रोख स्‍वरुपात प्राप्‍त झालेली आहे. तसेच सोने ८०९.२२० ग्रॅम (रुपये ५४,४९,६८६/-) व चांदी १४ किलो ३९८ ग्रॅम (रुपये ०९,९३,८९५/-) देणगी प्राप्‍त झालेली आहे. अशाप्रकारे विविध माध्‍यमातुन एकुण १६ कोटी ६१ लाख ८० हजार ८६२ रुपये देणगी संस्‍थानला प्राप्‍त झालेली आहे.

श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने प्राप्‍त झालेल्‍या दानाचा विनियोग हा श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्‍णालय, श्री साईप्रसादालय मोफत भोजन, संस्‍थानच्‍या विविध शैक्षणिक संस्‍था, बाह्य रुग्‍णांना चॅरिटीकरीता, साईभक्‍तांच्‍या सुविधाकरीता उभारण्‍यात येणारे विविध उपक्रम व विविध सामाजिक कामाकरीता करण्‍यात येत असल्‍याचे ही  गाडीलकर यांनी सांगितले.  

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thinking brain power. That is my motivation and capacity of problem solving.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *