अतुल सामाजिक व न्यायव्यवस्थेचा बळी
अतुल सुभाष मूळचा बिहारी तरुण , बंगलोर मध्ये ai इंजिनियर म्हणून काम करत होते. 2019 मध्ये निकिता नावाच्या मुलीशी लग्न झाले. काही दिवस संसार सुरळीत झाला. मूल ही झाल. पण संसाराला नजर लागली. निकिता ने बिहार मध्ये पोटगीचा दावा सुरू होता. दोनशे तारखा पडूनही निकाल आला नाही.
आई वडिलांचा सांभाळ करून चांगला मुलगा होण्याचे स्वप्न भंगले. उलट पोटगी करीत दोन लाख रुपये महिना मागणी करीत अतुलला त्रास देण्यास सुरुवात केल्याने या तरुणाने स्वतःची जीवन यात्रा संपवली.
या घटनेने समाज हळहळला पण दुर्देवाने एका कुटुंबाने आपला तरुण मुलगा गमावला. आता प्रश्न हा आहे की , ज्या न्यायालयात हीसुनावणी सूरु होती. त्या न्यायाधीश महोदय आता कुणाला व काय न्याय देणार आहेत ?
अतुल एकटा अशा कुटुंब काडीमोडीचा बळी नाही. हजारो तरुण आहेत. असे काही दावे आहेत , मुलींचे दुसरे लग्न झाले तरीही पहिल्या नवऱ्याशी पोटगीचे दावे सुरू आहेत. अशा परिस्थितीत समाज कुठे जात आहे. यात कुठला विचार रुजवला जात आहे. यावर प्रत्येकाने विचार करण्याची वेळ आली आहे.
अभिव्यक्ति स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय ? याची व्याख्या ठरवण्याची वेळ आली आहे. केवळ अभिव्यक्ति स्वातंत्र्य जपणे , महिला सक्षमीकरण याचा उहा पोह करून लोकांच्या जीवाशी खेळणे म्हणजे जीवन जगने ही जर समाज मनांची जीवनशैली होत असेल तर पांढरपोष निर्दयी समाज निर्माण होत आहे. याकडे दुर्लक्ष करता येणार नाही .