देशात महाकुंभमेळा आयोजन करण्यात आले. सुमारे एकशे चौरेचाळीस वर्षानी हा योग आल्याची जाहिरातबाजी करण्यात आली. खूप शानदार नियोजन केल्याच्या बातम्या देशभरातील नव्हे तर विदेशातील हिंदू समाजाला आकर्षित करण्यात यशस्वी ठरल्या.

पण चुकीची माहिती देण्याची किंमत शेकडो सामान्य हिंदूंनी आपला जीव गमावून मोजली आहे. अशा या पत्रकारितेने देशवासीयांचे नुकसान झाले आहे. एक सामान्य नागरिकाने पोस्ट केलेल्या व्हिडिओने कुंभमेळयाचे वास्तव व देशवासीयांची फसवणूक करणारी पत्रकारितेचा बुरखा फाडला आहे.

घटना घडली. चेंगराचेंगरी झाली. असंख्य भाविक मृत्यूमुखी पडली. आता सत्य लपवण्यात काय आणि का स्वारस्य आहे ? उत्तर प्रदेश प्रशासनाला . आणि सत्य लपवण्यासाठी तुम्ही पत्रकारांना दडपशाही करणार का ? ही पत्रकारितेची दुसरी बाजू आहे. जी घटनेची गंभीरता , घटनेची वास्तवता दाखविण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला अटकाव करून एव्हढी मोठी दुर्घटना लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न उत्तरप्रदेश सरकारचे प्रशासन करीत आहे.

धर्मावर श्रद्धा आणि आस्था आहे. म्हणूनच सामान्य पापभीरू देशवासी महाकुंभ मेळयाला गेले होते. पण इथे केलेल्या व्ही व्ही आय पीच्या दिमतील प्रशासन जुंपलेले होते. जिथे चेंगराचेंगरी झाली तिथे पोलिस उपलब्ध नव्हते. एक महिला पोलिस आपल्या अधिकाऱ्याला सोशल मीडियाच्या सहाय्याने मदत मागत होती. हे देखील सोशल मीडिया वर आलेलं आहे. जग गतिमान झाले आहे. या व्ही आय पी लोकांना खरोखर स्वर्ग प्राप्त होणार आहे का ?

एकीकडे महाकुंभ होणार , आपल्याला चार पैसे मिळतील. व्यापार वाढेल. अशीच अपेक्षा स्थानिक व्यापारी वर्गाची असते. पण या कुंभमेळयात झालेल्या चेंगराचेंगरीने भाविकांनी जिथे आश्रय घेतला त्यांचे किती नुकसान केले. त्याशिवाय याच दुकानाजवळ लोक मृत्यू पावली. हे सत्य सांगणारी ही मुलाखत आहे.

आजचे हे सदर महाराष्ट्र सरकार आणि प्रशासनाला जागे करण्यासाठी आहे. कारण आपल्याकडेही या कुंभमेळयाचे आयोजन होणार आहे. अर्थात नाशिक , त्र्यंबकेशवर , ब्रम्हगिरी आणि परिसर इथेही अशीच गर्दी होणार आहे. यात योगी सरकारने व्ही व्ही आय पी भक्त आणि सामान्य भक्त यांच्यात जो भेदभाव केला त्याची किंमत सामान्य भाविकानी मोजली आहे. याच एका कारणाने योगीची व्यवस्था व नियोजन हे बदनाम झाले आहे. दुर्दैवी बाब म्हणजे बोलघेवड्या धिरेन्द्र शास्त्रीने तर कळसच केला आहे , “ज्याने इथे ज्यांनी जीव गमावला आहे, त्यांना मोक्ष मिळाला ” असे विधान करून आपल्या असंवेदनशीलतेचे दर्शन घडवले आहे. ज्या कुटुंबाने आपल्या माय ,बहीण , भाऊ , वडील , आजी,आजोबा गमावले आहेत त्यांची हानी कुठल्याही स्नानाने आता भरून निघणार नाही.त्यांच्या अनेक पिढ्यांना हा कुंभमेळा स्मरणात राहील.

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thinking brain power. That is my motivation and capacity of problem solving.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *