साईबाबा संस्थांंनच्या प्रसाद लाडू व भोजन प्रसाद अखंड सुरू
तुकाराम मुंढे राज्याच्या अन्न आणि औषध विभागाचे आयुक्त झाल्यापासून राज्यभर कार्यवाही सुरू आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असलेली अन्न भेसळ यावर पहिल्यांदा प्रभावी कार्यवाहीला सुरुवात झालेली आहे. असे असताना साईबाबा संस्थानचा भोजन प्रसाद व लाडू प्रसाद हा बंद व्हावा यासाठी प्रयत्नशील असलेले सोशल मीडिया वर सक्रिय व काही स्वतंत्र पत्रकारिता करणारानी संस्थानच्या या प्रकल्पावर अन्न व औषध विभागाची कार्यवाही झाली अशा बातम्या प्रसारित केल्या आहे. या बातम्या कुणाच्या सांगण्यावरून प्रसिद्ध केल्या हा संशोधनाचा भाग आहे.
ही बाब एकीकडे भाविकात संभ्रम निर्माण करणारी तर दुसरीकडे संस्थान व्यवस्थापन यांचे दृष्टीने डोकेदुखीची ठरली आहे. परिणामी साईबाबा संस्थान प्रशासानाला याबाबत कायदेशीर फिर्याद नोंदवावी लागली आहे.
तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज धाडसत्राने भेसळ करनारांची झोप उडाली आहे. त्यांनी या बाबत एक टोल फ्री नंबर व मेल आयडी सार्वजनिक केला आहे. यावर तक्रार दाखल करण्याची कुवत नसलेले किंवा आपल्यासाठी दुसऱ्याने लढावे या मानसिकतेचे लोक समाजात कमी नाही.
साईबाबा संस्थानने या प्रकारची दखल घेऊन शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. व अन्न आणि औषध विभागाची कुठलीही कार्यवाही संस्थान भोजन प्रसाद व लाडू प्रसाद या व्यवस्थेवर झालेली नसल्याचा खुलासा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी https://teatimenews.click शी बोलताना केला आहे.
राज्यातल्या लाखों नागरिकांना मुंढे कडे आपल्या दुधावाल्याची ,उधार मिसळ, वडापाव दिला नाही ,त्या वडेवाल्याची ,मिसळ वाल्यांची तक्रार करायची आहे. पण ते करण्याच धाडस त्यांच्यात नाही. अलीकडे तर गल्ली बोळात दूध संकलन व प्लांट कुठे तरी शेतात सुरू आहेत. कारपेट मध्ये पिकवलेले आंबे ,इथरेल मध्ये बुडवून केळी लवकर पिकावली जात आहे. कराटे फवारून भाज्या हिरव्या केल्या जात आहे. या सर्व विषारी औषधाना आमच्या सरकारने परवानगी दिली आहे. त्यावर मुंढे काय कार्यवाही करतात याकडे लोकांच लक्ष लागलेल आहे.
तुकाराम मुंढे यांच्या धाडसत्राला हातभार लावण्याच्या इराद्याने कोपरगाव येथील स्वच्छता दूत सुशांत घोडके यांनी आपल्या फेसबूक पानावर अन्न औषध विभागांकडे अन्न भेसळ बाबत तक्रार करण्यासाठी लोकजागर सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून टोल फ्री क्रमांक व मेल आयडी सार्वजनिक केला आहे.
