दिल्ली मध्ये सुरू असलेले विद्यार्थी आंदोलन आज तेविसाव्या दिवशी सुरू आहे. तिथे पुणतांबा गावचे कोणी सहभागी आहे का तर नक्कीच नाही. तरीही या आंदोलकावर झालेल्या लाठीचार्ज हा अमानवीय आहे ,याने समाज दुखवला गेला आहे. म्हणून हा पुणतांबा बंद . संवेदनशील समाजाच्या अंतरमनाचा हा प्रतिसाद आहे. अर्थात या व्याख्या आणि संवेदनशीलता यांचा राजकारण आणि सत्ता यांच्याशी मेळ घालतला जावू शकत नाही. ती वेगळी प्रक्रिया आहे. एवढया मोठ्या देशात पुणतांबा सारख्या छोट्या गावात प्रतिक्रिया नोंदविली जाते आहे. याच स्वतः ला प्रचंड राजकारणी व नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. ती वेळीच केल नाही तर तुमची राजकीय दुकाने बंद होण्यास सुरुवात झाली आहे हे समजून घ्या. ही वेळ जबाबदारी घेण्याची व जबाबदारी निश्चित करण्याची आहे.

अभिजीत दिपके नावाच्या तरुणाने जो स्वतः विदेशात होता. संभाजीनगरात राहणारा हा तरुण आहे. याने भारताच्या सर्वोच्च न्यायाधीशांच्या वक्तव्यावर आपली एक सहज प्रतिक्रिया समाज माध्यमातून नोंदविली. प्रचंड व्हायरल झालेली ती प्रतिक्रिया ती मिडियाने लावून धरली आणि हीच घटना या झुरळ पार्टीला जन्म देणारी ठरली आहे. अर्थात या भूमीची एक परंपरा आहे की आपल्यासाठी दुसऱ्या कुणीतरी स्वतःच्या आयुष्याची कुटुंबाची राख रांगोळी करून घ्यावी त्याच्या मागे आपण उभे रहातो.आता तुम्हीच विचार करा, या विद्यार्थ्याना झालेल्या मारहाणीची दाखल मुख्यन्यायाधीश कशी घेतील? म्हणुणच तर त्यांनी या आंदोलकांची बाजू मांडायला गेलेल्या वकिलाना आमचा वेळ वाया घालवू नका असे म्हणून त्यांचे म्हणणे ऐकून न घेता धन्यवाद म्हणाले.

आम्ही स्वतंत्र भारतात जन्माला आलेलो आहोत. त्यामुळे तीव्र आंदोलन काय आणि कशी असतात याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला नाहीय. ज्याना आहे त्यानाही दिल्ली पोलिसांची कार्यवाही ही निंदनीयच वाटते आहे. या आंदोलनाच श्रेय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवडीच्या सोशल मिडियाला जाते. याच सोशल मीडियाने देशात समाज जागृती झाली. जनतेला त्यांचा अधिकार कळू लागला याला नजरंअंदाज करता येणार नाही. आणि याच मिडियाने दिल्लीतील आंदोलक निरपराध मुली ,मुलांवर झालेला बेकायदा अमानवीय लाठीचार्ज करण्यात आला.त्याचे वास्तव देशासमोर आणले. व आंदोलन शांततेच सुरू होते हे सिद्ध करून दिले. आता हे आंदोलन एकट्या सोनम वांगचूक किंवा अभिजीत दिपके या दोघांचे राहिले नसून ते संपूर्ण देशवासीयांचे झाले आहे. संपूर्ण देशभर दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रिया या सरकारच्या मनमानी, हटवाद व घमेंड यांना नांगडे करणाऱ्या आहे. या सरकारने पोलीसासोबत खाजगी गुंडांकडून मुलाना व पत्रकारांना देखील लाठ्या मारायला रस्त्यावर उतरवल हे सरकारच्या असफलतेच उघड प्रदर्शन आहे. आणि याला संयमाने आंदोलकांनी दिलेल उत्तर हे या आंदोलनाच यश आहे. यात पीडित आंदोलकांनी उपचार घेऊन पुनः आंदोलनात सहभाग घेतला आहे. ही प्रक्रिया सरकार आणि मोदीच्या घमेंडी प्रवृत्तीला चपराक आहे .

प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या वागण्यातील कथणी आणि करणी हे दोन्ही परस्पर विरुद्ध असल्याच समाजासमोर आल. सरकारच इंटेलिजन्स फेल असल्याचे समोर आल. प्रधानमंत्री आणि त्यांच मंत्रालय हे देशातील युवा शक्तीला किती महत्व देतात हे उघड झाल. की जय युवा शक्तीच्या जोरावर यांनी सत्ता मिळवली होती आज त्याच युवा शक्तीच्या सामर्थ्य आणि भवितव्याविषयी हे किती बेदरकार ,बेजबाबदार आहेत हे उघड झाल. नेपाळ,पाकिस्तान ,बांगलादेश, श्रीलंका हे अगदी छोटे देश आहे. हे सर्व मिळून अर्धा भारत होणार नाही तेव्हा यांच्याशी तुलना करून देशाला मूर्ख बनवल जावू शकत नाही. देशाच वास्तव हे किती भयानक आहे हे या आंदोलनाने उघड झाल आहे. सर्वात महत्वाचा म्हणजे या आंदोलनाला पुढे चालवण्याची जबाबदारी संपूर्ण देशवासियानी स्वीकारली आहे. हे जर मूर्ख अनुयायांना कळत नसेल तर हे त्यांच दुर्दैव आहे. त्यांच्या पुढच्या पिढ्या त्यांना नपुंसक म्हणतील.

अभिजीत दिपके सारख्या तरुणाने हे आंदोलन सुरू केले ,त्याला कुठली राजकीय ओळख नाही. व आंदोलन हिंसक करून या मुलांना अतिरेकी , पाकिस्तानी ,विदेशी मदतीवर हे आंदोलन सुरूअसा प्रचार करून, याला हिंदू मुस्लिम रंग देवून सहज बदनाम करता येईल.शाईनबाग आंदोलन जस बदनाम केल तस सहज करता येईल. दोन दिवस लाठ्या चालवून पोरांना पळवून लावता येईल. असे पादरे विचार पसरवून देश वासीयांना मूर्ख बनवता येईल म्हणून सरकारला यांची भीती वाटत नाही.

कॉंग्रेस सरकार जेव्हा इंदिरा गांधीच्या हाती होते. त्यानाही सत्तेचा गर्व झालाच होता. आज जसे मी आणि माझेच चालेल ही घमेंड त्यांनाही झालीच होती. परिणामी देशावर आणीबाणी लादली. त्यांचाही पराभव झाला होता. ही जनता आहे. तुम्हाला डोक्यावर घेते आणि पायदळी तुडवते. आणि कुठल्याही सरकारने घेतलेले सर्व निर्णय हे नव्याने बहुमताने सत्तेत येणारे सरकार रद्द वा सुरू ठेवू शकते.तेव्हा जनतेने त्यांचा अधिकार पूर्ण भानावर राहून कुठल्याही राजकीय व्यक्तीवर भरवसा ठेवण्याचे दिवस राहिलेले नाही. तुमच्या विचारांना तिलांजलि देणारे पळकुट्या लोकप्रतिनिधीचा चौकात कान धरण्याच धाडस या आंदोलनासारख जन माणसात याव लागेल. कॉँग्रेसच्या सत्तेत आण्णा हजारे यांनी आंदोलन केल होत तेही अस चिरडता आलं असत. पण त्या सरकारला चार स्तंभावर उभी असलेली लोकशाही मान्य होती.अस म्हणव लागेल.म्हणूनच आण्णाशी चर्चा करून हे आंदोलन सोडवल होत. याशिवाय एकहाती सत्ता असतानाही तत्कालीन मंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामे दिले होते. त्याने त्यांच राजकारण संपल नाही.या उलट नीतिमान राजकारणी म्हणून त्यांचा आदर वाढला होता . या जबाबदारी घेण्याच्या व खुल्या मनाने स्वीकारण्याची परंपरा ही लाल बहादूर शास्त्री यांनी सुरू केली होती. तेव्हढं मनाचा मोठेपणा या भित्रीभागूबाई सरकार कडून दाखवला जाऊ शकत नाही. धर्मेंद्र प्रधानची विकेट पडली की नितीन गडकरी , निर्मला सीतारमन , अश्विनी वैष्णव यांच्या सह अनेकांच्या विकेट पडतील याची भीती समस्त भाजप प्रेमी आणि सरकारला वाटते. यांना पर्याय देखील नाहीय यांचेकडे ही बाब लक्षवेधी आहे.

पुणतांबा गांव बंदला धरून विषय सुरू केला होता . थेट गल्ली ते दिल्ली म्हणू या. दिल्लीच्या अन्याय , बेकायदा ,अमानवीय लाठीचार्जचा निषेध या गावात नोंदविला जातोय. ही फार गंभीर बाब आहे. हे संपूर्ण गांव सत्ताधारी ,भाजपाच्या नेतृत्वाखाली असलेले ही नगरी आहे. अशा ठिकाणच्या सर्व समाजात निषेधाची भावना निर्माण होणे ही सरकारला आत्मचिंतन करायला लावणारी घटना आहे. हा बंद पुकारलेल्या कुठल्याही युवकाला कुणीही प्रेरणा दिली नाही तर त्याला हे विदारक ,हिंसक ,अत्याचाराच दर्शन प्रधानमंत्र्यांच्या लाडक्या सोशल मीडियाने घडवल आहे. त्याने त्याच्या अंतर्मनाला बंद पुकारण्याची शक्ति दिली आहे. दिल्ली पासून गल्ली पर्यन्त एकच मागणी आहे . धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला पाहिजे. ते स्वतः हून देणार नाही. त्याला फार नैतिकता लागते. ती यांच्यात नाही. तेव्हा

टीप : या लेखासोबत सोशल मीडियाचे काही रील आहेत. त्या तुम्हाला विचलित करू शकतात. तसेच हा लेख जशाचा तसा प्रसारित करण्यास लेखकाची हरकत नाही.

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thinking brain power. That is my motivation and capacity of problem solving.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *