अभिलेखपाल रंगेहाथ चारीमुंड्या चित
अहमदनगर लाचलुचपतची कार्यवाही
सतत नागरिकांचा छळ होत असलेल्या भूमी अभिलेख राहाता कार्यालयात लाचलुचपतची कार्यवाही आज अभिलेखपाल दुशिंग याला लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे .लाचलुचपत विभाग आपला मित्र आहे . तेव्हा बिनधास्त रहा. आणि थेट तक्रार करा.
याप्रकरणी अहमदनगर लाचलुचपतच्या सापळा लावलेल्या अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती : तक्रारदार यांनी सन २०१७ बाभळेश्वर बुद्रुक, ता. राहाता,जि. अहमदनगर येथील गट क्र व उप विभाग ६५ मध्ये १ हेकटर ५२ आर शेती क्षेत्र विकत घेतले होते, सदर क्षेत्राची तक्रारदार यांनी खाजगी मोजणी केली असता ३२ आर क्षेत्र कमी भरले होते, त्यामुळे तक्रारदार यांनी सदर क्षेत्राची मोजणी होणे करिता २०२२ मध्ये मा. दिवाणी न्यायालय,राहाता येथे अर्ज केला होता,त्यानुसार .मा दिवाणी न्यायालयात दिवाणी दावा क्र. १५१/२०२२ चालू होता,सदर दाव्यामध्ये मा. न्यायालयाने दिनांक ०४/०२/२०२३ रोजी च्या आदेशात उप अधीक्षक ,भूमी अभिलेख,राहाता यांना सदर जमिनीचा नकाशा व रिपोर्ट दिनांक १०/०३/२०२३ पावेतो सादर करण्यास आदेशीत केले होते ,
त्यानुसार तक्रारदार यांनी वेळोवेळी भूमिअभिलेख कार्यालय राहाता येथे जाऊन यातील आलोसे दुशिंग यांना नकाशा व रिपोर्ट तयार करून मा. न्यायालायत लवकर सादर करा या बाबत विनंती केली होती, दिनांक २०/०६/२०२३ रोजी यातील आलोसे दुशिंग यांनी नकाशा व रिपोर्ट तयार केला होता परंतु कोर्टात पाठविला नव्हता, म्हणून यातील तक्रारदार यांनी दिनांक ०२/०७/२०२३ रोजी यातील आलोसे दुशिंग यांना भेटून नकाशा व रिपोर्ट मा. न्यायालयात पाठविण्याची विनंती केली असता आलोसे दुशिंग यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांच्या बाजूने नकाशा व रिपोर्ट मा. न्यायालयात सादर करण्यासाठी २५०००/₹ लाच मागणी केली बाबत ची तक्रार आज दिनांक ०५/०७/२०२३ रोजी प्राप्त झाली होती, त्यानुसार आज दिनांक०५/०७/२०२३ रोजी भूमीअभिलेख कार्यालय,राहाता येथे पंचासमक्ष पडताळणी केली असता आलोसे दुशिंग यांनी तक्रारदार यांचेकडे मा न्यायालयात रेपोर्ट सादर करण्यासाठी पंचासमक्ष
२५०००/₹ लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले, त्यानुसार आज दिनांक ०५/०७/२०२३ रोजी भूमी अभिलेख कार्यालय,राहाता येथे सापळा आयोजित केला असता यातील आलोसे दुशिंग यांनी तक्रारदार यांचेकडून पंचासमक्ष २५०००/₹ लाच रक्कम स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे।
आलोसे दुशिंग यांचे विरुद्ध राहता पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
नाशिक परिसक्षेत्र पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांचे मार्गदर्शनाखाली प्रवीण लोखंडे यांच्या टीमने सापळा यशस्वी केला. यात पो हे कॉ संतोष शिंदे,पोलिस अंमलदार रविंद्र निमसे,चालक पो हे कॉ. हरुन शेख यांचा सहभाग होता .