राधाकृष्ण विखे पाटील सहकारी ट्रक वाहतूक संस्थेच्या पंपावरच लाच मागितली
हम नाही सुधारेंगे … अशी अवस्था सरकारच्या अनेक विभागाची झाली आहे.सामान्य नागरिकांना तर बरेच सरकारी कर्मचारी दर दिवशी नागवतात.पण विद्यमान मंत्र्यांच्या कारखान्याच्या सहकारी संस्थेच्या पेट्रोल पंपावर लाच मागून वजन मापे निरीक्षकाने व्यवस्था कुठल्या स्तरावर किडली आहे. याचे दर्शन घडवले आहे .
महसूल मंत्री यांच्या नावाने सुरू असलेली राधाकृष्ण विखे पाटील सहकारी ट्रक वाहतूक संस्था आहे. सदर संस्थेच्या वतीने भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल पम्प चालविला जात आहे. या संस्थेचे प्रवरानगरचे मॅनेजर यांनी सदर पेट्रोल पंपाची वार्षिक तपासणी करून स्टॅम्पिंग प्रमाणपत्र देण्यासाठी यातील आलोसे गायकवाड, वजन मापे निरीक्षक, कार्यालय श्रीरामपूर हे 12,000/-₹ लाचेची मागणी करत असले बाबत ची तक्रार ला प्र वि अहमदनगर कडे दिनांक 29/01/2024 रोजी प्राप्त झाली होती, तक्रार नोंदविली. सदर तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक 29/01/2024 रोजी प्रवरानगर येथील संस्थेच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या पेट्रोल पंप येथे लाच मागणी पडताळणी केली असता यातील आलोसे गायकवाड यांनी तक्रारदार यांचे कडे पंचासमक्ष 12,000/-₹ लाच मागणी करुन तडजोडीअंती 10,000/-₹ लाच मागणी करून ती लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले,त्यानुसार आज रोजी प्रवरानगर येथील सदर संस्थेच्या पंपावर लोकसेवक गायकवाड यांचे विरुद्ध सापळा लावण्यात आला असता सदर सापळा कारवाई दरम्यान आलोसे गायकवाड यांनी यातील तक्रारदार यांचेकडुन पंचासमक्ष 10,000/-₹लाच रक्कम स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
लोणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या लाचलुचपत प्रकरणात पोलिस उप अधीक्षक प्रवीण लोखंडे, यांच्या सापळा पथकाचे पोलीस अंमलदार रवी निमसे, सचिन सुदृक,किशोर लाड,चालक हरून शेख यांनी लाचखोर वजनमापे निरीक्षकास रंगेहाथ पकडण्याची मोहिम यशस्वी केली.