प्रदूषण मंडळाचा विक्षिप्त कारभार
एकीकडे राज्यात अतिवृष्टि झाली , शेतकऱ्यांचे नुकसान झाले . त्यात भर टाकण्याचे काम परिसरातील दारू प्रकल्प यांनी केले . राहाता तालुक्यातील पुणतांबा परिसरात गोदावरीला मिळणारे ओढ्या ,नाल्यात या कारखान्यानी आपले विषारी रासायनिक पाणी सोडून संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला.
या प्रकारची तक्रार पुणतांबा येथील भास्कर मोटकर या शेतकाऱ्याने मुख्यमंत्री कार्यालयात केली. त्यावर कुठलीच कार्यवाही झाली नाही म्हणून तब्बल एक महिन्याने याच शेतकाऱ्याने सरकारी यंत्रणेला जागे करण्याच्या हेतूने पुन्हा नव्याने फोटो ,विडिओ सह मुख्यमंत्री कार्यालयाला मेल केला. त्यावर वीस दिवसांनी राज्य प्रदूषण विभागाला जाग आली. अर्जदारला कार्यवाहीबाबत माहिती देण्याचे आदेश आल्याने संबंधित अधिकारी रवींद्र पाटील यांनी परिसरातून पाण्याचे नमुने गोळा करण्याचा दिखावा केला असल्याचा आरोप तक्रारदराने केला आहे.

नमुने घेण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्याने घेतलेल्या पाणी नमुन्याचा कुठळही पंचनामा केला नाही याशिवाय तक्रारदाराला कुठलीही पोहच न दिल्याने ही सर्व कार्यवाही संशयच्या भोवऱ्यात अडकली आहे.
विशेष म्हणजे या अधिकाऱ्याने दूषित रासायनिक पाणी वाहून जावे म्हणून येण्यास उशीर केला. तरीही शेतात पाइप टाकून या ओढा नाला , कात नाला , तसेच शेतकऱ्यांच्या शेतात रात्री टँकर ने हे रासायनिक द्रव्य टाकल्याचे समोर आले आहे.
