देशभर रेल्वेचा विकास आणि विस्तार मोठ्या प्रमाणात सुरु आहे. अशा परिस्थितीत हा पैसा जनतेचा आहे. तो कुण्या राजकारण्याच्या किंवा मंत्र्याच्या खाजगी बँक खात्यातुन आलेला नाही. हे वास्तव नेते भक्तांनी आणि नेत्यांनी स्वीकारलं पाहिजे. लोक तुम्हाला निवडून देतात ते जनतेचे विश्वस्त म्हणून देशाचे आणि जनतेचे मालक म्हणून नक्कीच नाही. हि सर्व संसाधने हि देशाची संपत्ती आहे. हे लिहिण्याची वेळ यावी हे दुर्दैव आहे.
एकीकडे GSt हा शेवटचा कर असल्याचा दावा करणारे सरकार रेल्वे तिकिटावर या Gst शिवाय कन्व्हिनियन्स चार्ज नावाचा जो कर वसूल करत आहे. तो दिवसाला सरासरी साडेतीन कोटी रुपये इतका आहे. आणि हा सर्व कर मध्यमवर्गीय समाज देतो आहे. अर्थात हि प्रचंड मोठी रक्कम दिवसाला ऑनलाइन काढले जाणारे सुमारे बारा लाख तिकिटांच्या माध्यमातून सक्तीने वसूल केली जात आहे. हि उघड लूट आहे. विशेष म्हणुजे सर्व सवलती बंद केलेल्या असूनही रेल्वे फक्त सत्तावन्न टके पैसे आकारते असा खोटा दावा रेल्वेने केलेला आहे. हे प्रत्येक तिकिटावर लिहिलेले आहे. या लुटीवर सरकार ,पदोपदी श्रेय घेणारे नेते हे मूग गिळून आहे. याबाबत कॅग ने कुठलाही आक्षेप नोंदविला नसल्याचे दिसून येते. तरीही मनाचा मोठेपणा दाखवीत या व्यवस्थेने रेल्वेच्या व्यवहारातील अनियमितता दाखवली म्हणजेच जनतेसमोर आणली आहे. याबद्दल कॅगला धन्यवाद दिले पाहिजे.
कॅगच्या रिपोर्टवर बारकाईने नजर टाकली तर हे रेल्वे विभागाने अनेक ठेक्यामध्ये कमी पैसे स्वीकारले आहे. ठेकेदाराकडून कोट्यवधींची अनियमितता सहन केली आहे. तरीही जोरात विकास सुरु आहे. म्हणजे मी दावा करत असलेली दररोजची लूट हि या विकासाचा मूळ आधार आहे हे सहज समजण्यासारखं आहे.
हा रिपोर्ट बघा. मतदान करताना विचार करा. या सावळ्या गोंधळाला आपण जबाबदार आहोत. आपली निवड (चॉईस ) हि व्यक्ती केंद्रित आहे. कि ज्यांना देश , देशवासी यांच्या पेक्षा स्वतः आणि आपले बगल बच्चे यांच्या कल्याणाचा ध्यास आहे.
