रेल्वे अंगावरून जाऊन ही बचावला!
पुणतांबा येथे गुन्हा करून फरार झालेल्या तीन सराईत गुन्हेगारांना राहाता पोलीस स्टेशनचे फौजदार सुनील गायकवाड यांच्या टीमने केले जेरबंद.
पोलीस यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार , श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव येते वाघाई देवीच्या यात्रेनिमित्ताने स्थानिक ग्रामस्थ परंपरेनुसार कावड नेण्यासाठी दिनांक १५ मार्च रोजी पुणतांबा येथे गोदावरी नदीवर आले.
पूर्व वैमनस्यातून आरोपी अमोल दुशिंग,विलास वाघ, धनु रोहम यांनी बेदम मारहाण केल्याची फिर्याद रवींद्र संजय वाघ वय 19 यांनी राहता पोलीस ठाण्यात नोंदविली आहे.
या घटनेत या तीनही सराईत गन्हेगारांनी रवींद्र वाघ याला पुणतांबा गोदावरी नदीच्या परिसरात काठ्या ,गजाने बेदम मारहाण केली. त्यात रवींद्र बेशुद्ध झाल्याने त्याला रेल्वे रुळात टाकून हे तीनही आरोपीं फरार झाले. दरम्यान तिथून जाणाऱ्या रेल्वे चालकाने पुणतांबा येथील स्टेशन मास्तरांना रेल्वे रुळात कुणी तरी पडलेली असल्याची माहीती दिली. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी रवींद्र वाघ यास संत जनार्दन स्वामी रुग्णालय मध्ये रेल्वे पोलीस बलच्या कर्मचाऱ्यांनी भर्ती केले.पुढील तपास राहाता पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या टीमने सुरु केला व तीनही आरोपीना जेरबंद करून गुरुवार दि २३ मार्च रोजी पुणतांबा येथील घटना स्थळावरून गुन्ह्यात वापरलेले काठ्या ,गज आरोपीनी काढून दिले.
