देशभरातून ५ लाख पशुप्रेमी भेट देण्याची शक्यता

शेतकरी, पशुपालक, तरूणांसाठी पर्वणी,

अडीच कोटी रूपयांचा महापशुधन एक्सपो २०२३

– देशातील सर्वात मोठे ‘महापशुधन एक्सपो २०२३’ चे दि.२४ ते २६ मार्च २०२३ दरम्यान शिर्डी येथे आयोजन करण्यात आले आहे. शेती महामंडळांच्या ४६ एकर जागेवर होणाऱ्या या प्रदर्शनात देशातल्या १६ राज्यातील पशुधनाच्या ६५ प्रकारांच्या जातीवंत प्रजाती आपणास पाहण्यास मिळणार आहेत. तीन दिवसांच्या या प्रदर्शनात देश-राज्यपातळीवर ५ लाख पशुप्रेमी नागरिक भेट देण्याची शक्यता आहे. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर होणारा हा ‘महापशुधन एक्स्पो’ शेतकरी, पशुपालक, तरूणांसाठी पर्वणी ठरणार आहे. अशी माहिती अहमदनगर दक्षिणेचे खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांनी आज येथे दिली.

‘महापशुधन एक्सपो २०२३’ संदर्भात खासदार विखे-पाटील यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे राज्याचे आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह, अतिरिक्त आयुक्त शितलकुमार मुकणे, अहमदनगर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सुनिल तुंबारे आदी उपस्थित होते.

या प्रदर्शनाचे उद्धाटन २४ मार्च २०२३ रोजी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता होणार आहे. यावेळी दक्षिणेचे खासदार सुजय विखे पाटील, खासदार सदाशिवराव लोखंडे, पशुसंवर्धन विभागाचे सचिव जे.पी.गुप्ता तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी ‌व्यासपीठावर उपस्थित असणार आहेत.

खासदार विखे पाटील म्हणाले, शेतकऱ्यांची उपजिविका पशुधनावर अवलंबून असते. देशातील विविध राज्यातील शेतकरी आपली उत्पादकता वाढविण्यासाठी पशुधनाच्या कोणत्या प्रजातींचा वापर करते. त्यासाठी वापरले जाणारे नवीन तंत्रज्ञान या विषयांवर विचारांचे आदान-प्रदान व्हावे. चर्चा, परिसंवादातून मंथन घडावे. यासाठी या प्रदर्शनात देशपातळीवर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ पशुपालकांना होणार आहे. या प्रदर्शनात जनसेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन ही करण्यात आले आहे. २४ मार्च रोजी स्थानिक विद्यार्थ्यांनी तयार केलेले रामायण महानाट्य, २५ मार्च रोजी चला हवा येऊ द्या व २६ मार्च रोजी महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम होणार आहे. जनसेवा फाऊंडेशन च्या माध्यमातून प्रदर्शनात भेट देणाऱ्या राहाता व शिर्डी परिसरातील नागरिकांसाठी १०० बसेसच्या विनामूल्य व्यवस्था करण्यात आली आहे.

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thinking brain power. That is my motivation and capacity of problem solving.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *