पर्यावरण संवर्धन काळाची गरज…
– जिल्हा न्यायाधीश सयाजीराव को-हाळे

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी नागरिकांनी वृक्षारोपणाचे पालकत्व स्विकारुन पर्यावरण संवर्धन कार्यात काळाची गरज ओळखून सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हा न्यायाधीश सयाजीराव को-हाळे यांनी केले. 

तालुका विधी सेवा समिती, कोपरगांव वतीने जागतिक पर्यावरण सप्ताह निमित्ताने श्रध्दानगरी व जोशीनगर परिसरातील सार्वजनिक जागेत वृक्षारोपण आणि पर्यावरण जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश – १ सयाजीराव को-हाळे, अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी भगवान पंडित,कोपरगांव वकील संघाचे माजी अध्यक्ष अॅड. शंतनू धोर्डे,ज्येष्ठ नागरिक सुधाप्पा कुलकर्णी,जगन्नाथ खर्डे, अजित लोहाडे,गिरीष जाधव, सुभाष बडजाते,कालकुंद्री,वनक्षेत्रपाल निलेश रोडे,स्वच्छतादूत वनश्री सुशांत घोडके, वनपाल सुनीता यादव,न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बंडू बडे,आयुर्वेद तज्ञ डॉ.तुषार गलांडे, विधी सेवा समितीचे सागर नगरकर आदींसह श्रध्दा नगरी व जोशीनगर चे नागरिक उपस्थित होते.

पंचायतन योजना अंतर्गत कडूलिंब,जांभुळ,शिसम, बेल, बदाम, बकान यासह जैविक विविधतेशी समरस रोपांचे रोपण करुन पालकत्व दिले.

या प्रसंगी न्यायाधीश भगवान पंडित यांनी देशी झाडांचे महत्त्व सांगून वृक्षारोपण आणि पर्यावरणाचे महत्त्व विषद केले.येत्या पावसाळ्यात वृक्षारोपण संवर्धन सारखे उपक्रम नागरिकांनी हाती घेऊन पर्यावरण संवर्धनाचे आवाहन केले.

या प्रसंगी परिसरातील अॅड. प्रेरणा पटणी,श्रीकृष्ण देशपांडे, सचिन कुलकर्णी,डॉ. सचिन उंडे,वसंतराव ठोंबरे,संदिप (बाळासाहेब) चव्हाण,बाजीराव उगले,महेंद्र निकम, किरण वर्पे, मनिल नरोडे,इंद्रजित नरोडे, गिरीश जाधव,डॉ.श्रीकृष्ण जगदाळे,धीरज बजाज, शितल बडजाते, वैभव जोशी,शैलेंद्र बनसोडे, प्रशांत बडजाते, सचिन कुलकर्णी, रामराव साबळे, मकरंद जोशी, जितेंद्र लोढा,किरण डांगे, देवेंद्र पोरवाल, संतोष कुलकर्णी,धीरज बजाज, गणेश लाडे,लता ठोळे, तेजश्री भुजबळ, अनिता खरात, विक्रम गेहलोत, जितेंद्र पाटणी, चंद्रकांत वाघ, ज्ञानेश्वर थोरे, संतोष कुलकर्णी, मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर,जगदीश कोतकर, शरद कांबळे,सौ.रुपाली गहेलोत, डॉ.सौ. काजल गलांडे,सौ.जाधव,सौ.कल्याणी बनसोडे,शंकर घोडेराव, विकास बेंद्रे, योगेश भागवत, डॉ. एस. आर. जावळे, विलास ठोळे, शितल बडजाते,डॉ.समीर शहा,शर्मा, चांडक यांचे सह श्रध्दानगरी, जोशीनगर येथील रहिवासी, वृक्षप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थितांचे स्वागत आयुर्वेद तज्ञ डॉ.तुषार गलांडे, प्रास्ताविक मनिल नरोडे यांनी सुत्रसंचालन अॅड. प्रेरणा पटणी तर आभार सचिन कुलकर्णी यांनी मानले.

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thing power.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *