मिशन कावेरी !

सुदान मध्ये अडकलेल्या भारतीय कामगारांना सुरक्षित भारतात आणण्यासाठी मिशन कावेरी हे राबविले जात आहे . तिथे चार साडे चार हजार भारतीय नागरिक वेगवेगळ्या शहरात ,गावात अडकलेले आहेत .
या देशाची खार्टूम नावाची राजधानी आहे . येथूनच तिथे देशभर जात येते . तिथले राष्ट्रपती किंवा देशाचे प्रमुख हे लष्कराचे प्रमुख आहे . परंतु तिथे आणखी एक खाजगी सैन्य असलेले खाजगी सरकारच्या समतल व्यवस्था आहे . त्या दोन व्यवस्थेत हे भांडण सुरु झाल्याने सुदान मध्ये युद्ध परिस्थिती निर्माण झाली आहे .
या युद्धात खार्टूम शहराचे प्रचंड नुकसान झाले आहे . व याच शहरात अनेक मोठ्या कंपन्यांचे मुख्यालय आहेत .
येथून चारशे किलोमीटर अंतरावर कनान साखर कारखाना आहे. त्यात सुमारे काम करणारे सुमारे ४५० भारतीय कामगार हे अडकून पडले आहे . यात २० कुटुंब आहेत .बाकीचे लोक हे एकल आहेत . भारत सरकार सर्व नागरिकांना सुरक्षित मायदेशी घेऊन येण्यासाठी सर्व बाजूने प्रयत्नशील आहे . विशेष म्हणजे भारतीय दूतावास आहे तिथे अडकलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकांच्या संपर्कात आहे . त्याच एका कारणाने हे सर्व नागरिक समाधानी आहेत व स्वतःला सुरक्षित समजत आहे .
या युद्ध परिस्थितीत मानवी स्वभावाचा भाग असलेली सार्वजनिक मालमत्तेची हानी ,लुटालूट या घटनाही घडत आहे . अन्न धान्य ,भाजीपाला यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत . एकूणच जीवनावश्यक वस्तूचा सर्वत्र तुटवडा असल्याचा अनुभव मुकुंद यांनी कथन केला आहे . बँका बंद आहेत . आमचे पैसे संपलेले आहे . पासपोर्ट मुख्यालयी अडकलेला आहे . कि ज्या खार्टूम शहरात जाणे अशक्य आहे . वास्तविक पाहता हा इथल्या साखर उद्योगाचा ऑफ सिझन आहे . त्यामुळे आम्ही सारे गावी म्हणजेच भारतात येत असतो . त्याची तयारी पूर्ण झाली होती . पण अचानक हि परिस्थिती ओढवली आहे . इथल्या स्थानिक लोकात कुठला संघर्ष नाहीय . ते आमच्या मदतीला धावून येत आहेत . हा सत्ता संघर्ष आहे . कि जो दोन शक्तिशाली संस्थेत सुरु आहे .आम्ही भारतीय आता पर्यंत सुरक्षित आहोत. आमचा सरकार आमची काळजी वाहत आहे याच समाधान आहे .

हा व्हिडीओ तिथे अडकलेल्या नागरिकांना पाठवला जात आहे . त्यासोबतच भारतीय दूतावास या सर्वांच्या संपर्कात आहे .
ज्यांची लहान मुले आहे ,काही वृद्ध ,आजारी आहे त्यांना प्राधान्यानाने भारतात घेऊन जाणार आहे , दूतावास दररोज संपर्कात आहे जाण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना दिल्या जात आहे .

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thing power.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *