पुणेकरांसाठी पर्वणी …
जिल्हा न्यायाधीश सुनील वेदपाठक यांच्या मयूर चित्रांचे विनामूल्य प्रदर्शन
आज उदघाटन झालेल्या या मयूर चित्र प्रदर्शनाचे उदघाटन ज्येष्ठ कलाकार मुरली लाहोटी व चित्रकार प्रमोद कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
पुणे येथील बालगंधर्व रंगमंच कलादालनात हे प्रदर्शन पुढील तीन दिवस सुरु राहील. हे सर्वासाठी खुले आहे.
अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा न्यायाधीश पुणे, श्याम छ.चांडक तर उद्घाटक ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी आणि प्रसिद्ध चित्रकार तथा शिल्पकार प्रमोद कांबळे हे होते.






कार्यक्रमाचे प्रास्ताविक चित्रकार सुनील वेदपाठक यांनी केले.
मुरली लाहोटी आपल्या मनोगतात म्हणाले,कोणत्याही कलेची उपासना जर मनापासून केली तर ती कला त्या कलावंतांस चिरतरुण तर ठेवतेच पण त्याला सदैव कार्यरत राहण्याची ऊर्जा प्रदान करते,प्रमोदजी कांबळे आपल्या भाषणात म्हणाले ,मोर हा एकच विषय घेऊन त्यावर अगणित आविष्कार करणारे एकमेव कलावंत म्हणजे सुनील वेदपाठक हे होत. खर या सर्व चित्रांचे एक सुंदर पुस्तक झाल्यास ते असंख्य लोकापर्यंत पोचेल व त्याद्वारे लोकांची पावले चीत्रकले कडे आपसूकच वळतील .
अध्यक्षीय समारोपात माननीय चांडक सर म्हणाले,प्रत्येकाला एक तरी कला अवगत असणे गरजेचे असते त्यामुळे जीवन समृध्द तथा परिपूर्ण व्यकिमत्व घडण्यास मदत होते.
याशिवाय पोपटभाऊ बागमार यांनीही त्यांचे विचार मांडले.
आभार प्रदर्शन सुनील वेदपाठक यांनी केले.
सूत्रसंचालन श्रीमती जागृती भाटिया न्यायाधीश यांनी अतिशय खुमासदार शैलीत केले.
याच प्रसंगी पद्मभूषण डॉक्टर संचेती,निवृत्त महसूल आयुक्त उमाकांत दांगट यांनीही या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली तसेच न्यायाधीश,वकील,आणि रसिकांनी प्रचंड गर्दी केली होती.