स्वच्छतेचे बाल संस्कार कौतुकास्पद

नगरपालिका शिक्षण मंडळ शाळा क्र. ६ विद्यार्थ्यांचा प्लास्टिक बाटलीत कचरा संकलनाचा अभिनव उपक्रम…

सूर्यतेज संस्था वतीने स्वच्छतादूत वनश्री सुशांत घोडके यांनी दखल घेत केला शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सन्मान…

कोपरगांव नगरपरिषदेच्या शिक्षण मंडळ शाळा क्र.६ येथील विद्यार्थ्यांचे छोटा कचरा संकलनाचे कार्य व स्वच्छतेचे बाल संस्कार कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन निवासी नायब तहसिलदार पोपटराव पवार यांनी केले.

credit : Sushant godake

कोपरगांव नगरपरिषदेच्या शिक्षण मंडळ शाळा क्र.६ येथील मुख्याध्यापिका कल्पना निंबाळकर यांचे मार्गदर्शनाखाली उपशिक्षिका सुनिता इंगळे यांचे संकल्पनेतून शालेय विद्यार्थ्यांना घर व परिसरातील छोट्या प्लास्टिक कचरा प्लास्टिक बाटलीत एकत्र करून संकलन अभियान सुरु केले आहे. सुमारे ५० बाटली कचरा संकलन केले. या कृतीची दखल स्वच्छतादूत वनश्री सुशांत घोडके यांनी घेतली. त्यांनी सूर्यतेज संस्थेच्या वतीने निवासी नायब तहसिलदार पोपटराव पवार यांचे शुभहस्ते मुख्याध्यापिका कल्पना निंबाळकर, संकल्पक उपशिक्षिका सुनिता इंगळे,सविता साळुंके,आरती कोरडकर,शिक्षक – अरुण पगारे यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ तसेच स्वच्छतामित्र विद्यार्थांना पेन भेट देऊन सन्मान केला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते संदिप ठोके, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा अर्चना वाहुळकर शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

कोपरगाव नगरपरिषदेच्या शिक्षण मंडळ शाळा क्रमांक ६ विद्यार्थींनी प्लास्टिक बाटलीत छोटा प्लास्टिक कचरा नगरपालिकेकडे सुपुर्द केला जाणार आहे.कचरा संकलनाची प्रेरणा इतरही शाळेच्या विद्यार्थ्यांनी घ्यावी. तसेच आंबा कोई पासून रोप तयार करून रोपे तयार करावी. तसेच विविध झाडांच्या बियांचे संकलन अभियान राबवावे.असे आवाहन वनश्री सुशांत घोडके यांनी केले आहे. मराठी शाळेतील विद्यार्थी यांनी राबविलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे…

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thing power.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *