साईबाबा संस्थानच्या यंदाच्या आदर्श कर्मचारी व गुणवंत विद्यार्थ्यांचा कामगार दिनी गौरव
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) च्या वतीने ०१ मे २०२४ रोजी सकाळी ०७.१० वाजता महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या औचित्यावर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांच्या हस्ते ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न होवून आदर्श कर्मचारी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, मुख्यलेखाधिकारी श्रीमती मंगला वराडे, प्रशासकीय अधिकारी विठ्ठलराव बर्गे, भिकन दाभाडे, मधुकर जोरी, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी व सर्व विभागांचे विभाग प्रमुख, कर्मचारी, शैक्षणिक संकुलाचे शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सर्वप्रथम संस्थानच्या अधिकारी व कर्मचारी यांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. अनेकांच्या बलीदानातुन आणि त्यागातुन महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली असून महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अनेकांचे मोलाचे योगदान आहे तसे कामगारांचेही आहे असे नमूद केले.
तसेच, यावेळी बोलतांना मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर म्हणाले की, श्री साई भक्तांनी दिलेल्या देणगीमधून साई संस्थानचे मोठे सेवा कार्य सुरू असून यासाठी सर्व कर्मचा-यांचे योगदान महत्वाचे आहे. कर्मचा-यांचे योगदानामुळेच आज श्री साईबाबा संस्थानच्या नावलौकिकात भर पडत आहे. सर्व कर्मचा-यांनी श्री साई भक्त केंद्रस्थानी ठेवून आपली सेवा सुरू ठेवावी. कर्मचा-यांच्या विविध प्रश्नांची सोडवणुकीसाठी आपण सकारात्मक असुन ते प्राधान्याने सोडविले जातील. गौरव होत असलेल्या कर्मचा-यांचे अभिनंदन करत इतर कर्मचा-यांनीही यामधून प्रेरणा घेवून अधिकाधिक सेवा संस्थान कामकाजासाठी करावी अशी भावना व्यक्त केली.
आज कामगार दिनाच्या औचित्यावर संपन्न झालेल्या कार्यक्रमात श्री साईबाबा संस्थानचे प्रशासकीय अधिकारी विठ्ठलराव बर्गे, मंदीर विभागाचे प्र. अधिक्षक रमेश चौधरी, प्र. लेखाधिकारी कैलास खराडे, साईबाबा हॉस्पिटलचे वरिष्ठ क्ष-किरण शास्त्रज्ञ डॉ. उमेश व्यवहारे, मेंदू शैल्य विशारद डॉ. मुकुंद चौधरी,यांच्या सह सर्व विभागातील यंदाच्या एकुण ४८ कर्मचा-यांचा आदर्श कर्मचारी म्हणून संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे आदी मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, श्रींची प्रतिमा, शॉल व गुलाबाचे फूल देवुन सत्कार करण्यात आला.
त्यानंतर कौशल्य विकास मंत्रालय भारत सरकार, केंद्र शासनाच्या इंडिया स्किल्स अंतर्गत 2023-24 करिता Don Bosco Centre for Learning, कुर्ला (मुंबई ) येथे दिनांक 19 व 20 मार्च 2024 रोजी आयोजित राज्यस्तरीय कौशल्य स्पर्धे मध्ये फिटर व्यवसायातून Manufacturing Team Challenge या कौशल्या मध्ये महाराष्ट्र राज्यातून द्वितीय क्रमांक प्राप्त करून श्री साईबाबा संस्थान औद्योगिक प्रशिक्षण संस्था (I.T.I.) चे नाव राज्य पातळीवर गाजविणा-या आदित्य बोरबने, महेश लांडे, गौरव गवळी या विद्यार्थ्यांचा सत्कार मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केला.

श्री साईबाबा कन्या शाळा व श्री साईबाबा महाविद्यालयाकडील बाबर सर यांचे मार्गदर्शनाखाली विविध खेळात वैशिष्ट्यपुर्ण कामगिरीबद्दल समरीन सय्यद, प्रणाली मते, सातारा येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय थ्रोबॉल स्पर्धेमध्ये श्री साईबाबा कन्या विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचा 19 वर्षे वयोगटातील संघाचा तृतीय क्रमांक पटकविण-या खेळाडू साक्षी जरंगे, पूजा कोते, स्नेहा हेगडमल, जोया कतवाल, आलिया सय्यद, पायल पुंड, श्रुती उपाध्ये, सायली पेटारे, ऋतुजा पवार, साक्षी सोनवणे, समरीन सय्यद, सायली पेटारे या विद्यार्थीनींनी यश संपादन केले त्याबद्दल त्यांचा सत्कार संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केला.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरचे अध्यापक वसंत वाणी सर व इंग्लीश मिडीयम स्कुलचे राजेंद्र कोहकडे सर यांनी केले.