हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करणारे इंग्रजांना देशातून घालवण्यासाठी हाच दिवस महत्वाचा ठरला होता. या लढ्यात त्यावेळी देशात असलेला प्रत्येक सजीव जीव आपले बलिदान देण्यास तयार होता. हीच भावना आधुनिक बंदुका व तोफगोळ्यांचा जुलमी राज्य गाजवणारे इंग्रजांना देश सोडून जाण्यास कारणीभूत होती.
आज देशात अगदी विपरीत परिस्थिती आहे . देशाशी किती गद्दारी करू ग्राहकांची , रुग्नांची , कामगारांची ,व्यापाऱ्यांची, विद्यार्थ्यांची, सामान्य नागरिकांची किती लूट करू ,किती छळ करू आंणि श्रीमंत होऊ हि चढाओढ सुरु आहे . कुणाचा कुणाला धरबंध राहिला नाही . आम्ही कुणासाठी सरकार निवडून देतो ? सरकारी यंत्रणा कुणासाठी काम करत आहेत ? जनता कुठे आहे . यांची उत्तरे शोधली तर या क्रांतिदिनाच्या निमित्ताने आपल्या संसाराची राखरांगोळी करून , कुटुंब ,धन समाप्ती वर तुळशीपत्र ठेवणारे प्रत्येक देशभक्ताने आजच्या या देशद्रोह्यांची दिलेले बलिदान निरर्थक ठरलय . हे सत्य स्वीकारणे म्हणजेच या सर्व बलिदानींना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली असेल असे मला वाटते.


या भूमीत जन्म घेतलेल्या कलाकारांनी देशभक्तीची ,देशप्रेमाची ज्योत तेवत ठेवली आहे . अशाच कलाकारांच्या या ज्योती भारतात जन्माला येऊन देशाशी बेईमानि करणारे बांडगुळांच्या चिता पेटवतील हि अशा बाळगू या .

By Admin

Dear reader , subscriber I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thing power.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized with PageSpeed Ninja