कोपरगांवात ११ गोवंश जनावरांची सुटका…
कोपरगाव शहर पोलीस स्टेशनची धडक कारवाई…
कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, पोलीस हवालदार लिंबोरे पोलीस हवालदार ती कोणे, पोलीस नाईक शेवाळे पोलीस कॉन्स्टेबल काकडे पोलीस कॉन्स्टेबल भांगरे पोलीस कॉन्स्टेबल खेमनर हे कोपरगाव शहरात कोंबिंग ऑपरेशन व नाकाबंदी करत असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सुभाष नगर कोपरगाव परिसरात कत्तलीसाठी गोवंश जातीचे जनावरे बांधून ठेवल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
त्यानुसार वरीष्ठ पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता गोवंश जातीचे ११ जनावरे व कत्तल केलेले मास मिळून आल्याने पोलिसांनी जागीच पंचनामा करून आरोपी समद फकीर मोहम्मद कुरेशी व मुंतजीर रोप कुरेशी हे राहणार सुभाष नगर कोपरगाव यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.पोलिसांनी ११ गोवंश जनावरांची सुटका पण संबंधित आरोपीच्या ओळख लोकांना होऊ नये याची काळजी घेतली.
जप्त करण्यात आलेले अकरा गोवंश जनावरे यांना गोकुलधाम गौरक्षा केंद्र कोकमठाण येथे पुढील संगोपनासाठी जमा करण्यात आले आहे. कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या सदर कारवाईचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले असून पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले जात आहे.