शिर्डी साई मंदिरात दर्शन घेऊन येणारे भाविकांना बाहेर पडताना बुंदी प्रसाद व उदीची पुडी देण्याची प्रक्रिया मा .खंडपीठाच्या आदेशाने सुरु झाली होती . परंतु कोरोना महामारी च्या कारणाने हि व्यवथा बंद ठेवण्यात आली होती .ती या श्रीरामनवमी पासून पुन्हा सुरळीत करण्यात आली. त्यानुसार साईबाबा संस्थान वर कार्यरत असलेल्या त्रिसदस्य समितीचे अध्यक्ष प्रधान न्यायाधीश येरलागड्डा व जिल्हाधिकारी सालीमठ यांचे हस्ते भाविकांना बुंदी प्रसाद व उदीचे वितरण करण्यात आले. यामुळे साईबाबा संस्थान कडून सर्वसामान्य भाविकांना प्रसाद मिळणार असल्याने भाविक आनंदी आहेत .
श्री रामनवमी उत्सवाच्या शुभमुहूर्तावर पुर्वीप्रमाणे दर्शन रांगेतील प्रत्येक साईभक्तास मोफत बुंदी प्रसाद पाकीट वितरण करण्याचा शुभारंभ संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधिश सुधाकर यार्लगड्डा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थानचे तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, सौ.मिनाक्षी सालीमठ, सौ.मालती यार्लगड्डा, प्रशासकीय अधिकारी दिलीप उगले, संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी उपस्थित होते.
Dear reader , subscriber
I am by born journalist , every time I am ready to start case study on social issue finding remedy and try to make a easy life for common man. Just because I have a typical critical thing power.