श्रीसाईबाबा संस्थान शिर्डी ,मुख्यकार्यकारी अधिकारी पी सिवाशंकर यांची बदली
देशातील श्रीमंत धार्मिक संस्थानाच्या यादीतील साईबाबा संस्थान याचे मुख्याधिकारी म्हणून चार मे रोजी नियुक्त झालेले पी सीवा सन्कर यांची तडकफडकी बदलीचे आदेश विधि काढले आहे .ते न्यायालयीन समितीचे सदस्य असूनही राजकीय हस्तक्षेपामुळे बदली झाल्याची चर्चा सुरु .
देश व जगभरातून साईबाबांच्या दर्शनासाठी कोट्यावधि भाविक शिर्डीत येत असतात. त्यामुळे हे देवस्थान देशात अव्वल श्रीमंत धार्मिक संस्थानात समाविष्ट आहे . गेल्या काही वर्षात या संस्थानाचा कारभार हा अनेकवेळा उच्च न्यायालयाच्या समितीकडे सोपविला गेला आहे. आजमितीलाही त्रिसदस्य समिती या ठिकाणी कार्यरत आहे . या समितीत अहमदनगर जिल्हा प्रधान न्यायाधीश , जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी साईबाबा संस्थान यांचा समावेश आहे . मे महिन्यात या संस्थानच्या मुख्य कार्यकारी पदी पी सीवा संकर यांनी पदभार स्वीकारला होता. पदभार स्वीकारण्यापूर्वीची त्यांनी सामान्य भाविकांच्या सोबत साई दर्शन घेण्याची फार चर्चा झाली होती.

स्वतःच्या मर्जीने काम करण्याच्या पद्धतीने सीवा संकर अनेकदा चर्चेत राहिले. मंदिर परिसरात त्यांनी चप्पल बंदी केली. त्या निर्णयावर ते ठाम राहिले. परिणामी त्यांनी प्रसाद लाडू विक्रीच्या ठिकाणी चप्पल स्टॅन्ड केले. खूप टीका झाल्यावर त्यांनी याच ठिकाणी या चप्पल स्टॅन्ड चे दोन भाग करून इथे प्रसाद लाडू विक्री पुन्हा सुरु केली.
सीवा संकर हे स्वतः कॉम्पुटर पदवीधर असल्याने त्यांनी साईबाबा संस्थानच्या ऑनलाईन दर्शन पास,आरती पास सह , देणगी कक्षातील घोटाळा करण्याचे मार्ग बंद करण्याची कार्यवाही केली .
त्यांनी व्ही आय पी वगळता आगंतुकासाठी तसेच प्रसार माध्यमासाठी दुपारी चार ते पाच हि वेळ निर्धारित केली होती. शाहरुख खानची गळाभेट व गावकऱ्यांना आधार शिवाय प्रवेश बंदी हि त्यांच्या बदलीमागची करणे असल्याची चर्चा सुरु आहे. त्यासोबतच स्थानिक राजकीय हस्तक्षेप झुगारून लावल्याने त्यांच्या बदलीसाठी शिर्डीतील पुढारी आग्रही होते.