जिल्हा गौण खनिज अधिकाऱ्याला स्वसंरक्षणार्थ गोळी चालवावी लागली !
महसूल विभागांने समाजातील गुन्हेगारी संपवण्यासाठी नवीन वाळू धोरण लागू केलं .परिणामी राज्यात अनेक गावात ,नदी पट्यात वाळूचे डेपो तयार करण्यात आले. त्यातून सुरळीत नाही पण रेशनिंग करून आज मितीला वाळू पुरवठा सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे गरजूना वाळू उपलब्ध होण्यास सुरुवात झाली. याबाबत लोक आशावादी आहे .कायद्याचे पालन करणारांनी बेकायदा वाळू घेणे बंद केले आहे .
तरीही आजही वाळू चोरांकडून बेकायदा वाळू उपसा व वाहतूक व साठा करणे सुरूच आहे . यावर उपाय म्हणून अहमदनगर अतिरिक्त जिल्हा अधिकारी सुहास मापारी यांनी ड्रोन ने बेकायदा वाळू साठ्यांचे फोटो , फुटेज घेऊन पंचनामे केले व सुमारे तीन हजार पाचशे ब्रास बेकायदा वाळूचे एकशे एकोणचाळीस पंचनामे करून सदर वाळू साठा करणाऱ्यावर कार्यवाही सुरु केली आहे. याच कार्यवाहीचा भाग म्हणून काल (रविवारी )मध्यरात्री दोन तीन वाजेच्या सुमारास जिल्हा गौणखनिज अधिकारी वसीम सय्यद हे आपल्या पथकासह श्रीरामपूर तालुक्यातील सरला गोवर्धन येथे कार्यवाही साठी गेले असता , त्या ठिकाणी सुरु असलेला वाळू उपसा करणारे चोरांनी या पथकावर हल्ला केला . यातून सय्यद यांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याची घटना घडली आहे .
वसीम सय्यद यांनी दिलेली माहिती अशी :
या घटनेत चाळीस,पन्नास वाळूचोरानी या दोन महसूल व दोन सशस्त्र पोलिसांच्या पथकावर हल्ला केल्याची घटनेत सात डंपर श्रीरामपूर तहसील कचेरीत जप्त करण्यात आले आहे.दरम्यान डंपरचे चाक काढून घेण्याचा प्रकार आज सकाळी झाला असल्याचे सय्यद यांनी सांगितले या घटनेचा तपास श्रीरामपूर अतिरिक्त अधिक्षक यांचे मार्गदर्शनाखाली सुरु आहे .