एक दिवसीय कृषी प्रशिक्षण कार्य शाळा पुणतांबा येथे संपन्न झाले.या कार्य शाळेस पुणतांबा परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पुणतांबा येथील ग्राम सचिवालय दालनात बँक ऑफ महाराष्ट्र पुरस्कृत महाबँक कृषी संशोधन आणि ग्रामीण विकास प्रतिष्ठान,ग्रामीण विकास केंद्र भिगवण यांच्या संयुक्त विद्यमाने पुणतांबा परिसरातील शेतकऱ्यासाठी कांदा लागवड तंत्रज्ञान शेतकरी कार्यशाळा दिनांक 24 जुलै रोजी सकाळी दहा वाजता आयोजित केली होती.प्रास्तविक पुणतांबा बँक ऑफ महाराष्ट्र व्यवस्थापक रवींद्र तनपुरे यांनी केले कांद्याच्या उत्पादनात आता अनेक समस्या येत आहेत शेतकऱ्यांना कुठल्याही मार्गदर्शनाची,शिबिराची गरज नाही शेतकरी बांधवांना अनुभव तगडा असतो पण वेळोवेळी होणारे बदल आणि येणारे तंत्रज्ञान या साठी आजचा कार्यक्रम घेण्यात येत आहे.
उमेश निकम (भिगवण शाखा अधिकारी) यांनी उपस्थित शेतकऱ्यांना भिगवण शाखा शेतकऱ्यासाठी राज्यभर अशी कार्यशाळा घेते.ग्रामीण विकास करणे हेच आमच्या शाखेचा उद्देश असून आम्ही दोन दिवसीय कार्यशाळेत दुग्धव्यवसाय,रेशीम पालन,शेळी पालन याचे प्रशिक्षण दिले जाते ते आमच्या बँके मार्फत मोफत दिले जाते.आपण बियाणे,खते,बियाणे,मशागत यांचे किमती शेतकऱ्याच्या हातात नाही यासाठी योग्य मेहनत घेऊन आपले उत्पादन वाढवून आपला आर्थिक उन्नती करता येईल.आपल्या गावातून पन्नास मातीचे नमुने असतील तर आमचा माणूस तुमच्या पर्यंत येऊन नमुने घेऊन जाईल. खत टाकले असेल तर आपण पंधरा दिवसांनंतर माती परिक्षण करून घ्यावे.
नितीन जाधव (कृषी शास्त्रज्ञ सातारा ):जमीन हा प्रत्येक पिकासाठी महत्वाचा घटक असून कोणत्या पिकासाठी आपली जमीन चांगली आहे हे पहाणे खूप महत्वाचे असून चांगले दिसणारे पीक असले तरी त्यातून मिळणारे उत्पन्न महत्वाचे आहे.शक्योतो हलक्या प्रतीच्या जमिनीत रोप निर्मिती टाळावे,जमिनीत काय आहे काय नाही हे पहिले तपासून घ्या सेंद्रिय कर्ब 0.5 आहे त्याला 50 टक्के उत्पन मिळणार सेंद्रिय पदार्थाचा वापर आपल्या जमिनीत वापरून मृत अवस्थेकडे जाणाऱ्या जमिनीच्या आरोग्य कडे लक्ष द्या.तसेच जमिनीचे निर्जंतुकीकरण सुरवातीच्या अवस्थेत करून घ्यावे.शेतकऱ्याकडे वेळ खूप कमी असतो.बी आपली काही लोक कंपनीचे बी वापरतात तर काही लोक घरातील वापरता त्यामुळे मातृत्व जर सुदृढ असेल तर रोप सुदृढ येईल.पातीचा कलर चांगला असावा,पात चिकटलेली असावी,कांदा गोल मध्यम आकाराचा असावा यासाठी बियाणाचे परिक्षण करून उगवण क्षमता चाचणी घेत जा.कांदा पिकाला पाण्यापेक्षा ओलावा गरजेचा आहे त्यासाठी गादी वाफ्याचा उपयोग करून ठिबक सिंचनाचा वापर करावा.शेवटी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत समाधान केले.या प्रशिक्षणास पुणतांबा,गोंडेगाव,डोणगाव,मातुलठाण,रामपुरवाडी,येथील शेतकऱ्यांसह बँकेचे कर्मचारी,कृषी सहाय्यक,कृषी केंद्राचे चालक नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
