शिर्डी लोकसभा सत्तेची चावी ” उत्कर्षा रुपवते “यांच्या हाती
शिर्डी लोकसभा निवडणूक रंगात आली. वंचितच्या एन्ट्रीने तिरंगी झाली आहे.
काल वंचित आघाडीच्या वतीने उत्कर्षा रुपवते यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत राहाता येथे आपला उमेदवारी अर्ज भरला. विशेष म्हणजे कार्यकर्त्यांचा मेळावा सुरु असताना प्रकाश आंबेडकरांनी फोन करून कार्यकर्त्यांना केलेले मार्गदर्शन हे कार्यकर्त्यांची ऊर्जा वाढवणारे ठरले.तीव्र उन्हातही कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला.आपल्या उमेदवारावर पुष्पवृष्टीही केली.
पूर्वाश्रमीची काँग्रेसशी नाळ जुडलेल रुपवते कुटुंब अशी ओळख अकोलेच नव्हे तर जिल्हाभर आहे. तिनपिढ्या एकनिष्ठ असलेल्या रुपवते कुटुंबाची यावेळी उमेदवारी मिळावी हि माफक अपेक्षा होती. न्याय यात्रेत व्यस्त राहुल गांधी किंवा काँग्रेसचे पक्ष श्रेष्टी यांचे पर्यंत उत्कर्षाची मागणी पोहचली नाही. याशिवाय महा विकास आघाडीत सहभागी उद्धव ठाकरे ,शरद पवार , नाना पाटोले यापैकी एकाहि नेत्याला महिला उमेदवार द्यावा असे का वाटले नाही हा प्रश्न “ उत्कर्षा रूपवतेच्या “उमेदवारीने परिसराला पडला आहे. सलग पंधरा वर्ष सामान्य कार्यकर्त्याच्या सोबत काँग्रेसची युवा पदाधिकारी म्हणून काम करणाऱ्याला पक्ष सोडून आपले राजकीय कर्तृत्व सिद्ध करण्याची वेळ येते. हे राजकीय खच्चीकरणाचे उदाहरण आहे.
उत्कर्षा रुपवते यांनी काँग्रेसला रामराम ठोकत वंचित मध्ये प्रवेश केला. त्यांची उमेदवारी निश्चित झाली. काल दुपारी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या प्रसंगी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला. या मेळाव्याला अनपेक्षित गर्दी पाहायला मिळाली. हि गर्दी महायुती व महाआघाडीच्या उमेदवारांच्या मेळाव्याच्या तोलामोलाची होती. त्यामुळे शिर्डी लोकसभेच्या निवडणुकीत चांगलीच चुरस पाहायला मिळणार असे दिसते.

सदाशिव लोखंडे हे महायुतीचे उमेदवार आहे. त्यांनी खूप कामे केल्याचा दावा केला जात आहे. असे असले तरीही त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस याना यावे लागते. यामुळे शिर्डी लोकसभेची हि जागा आता विद्यमान सरकारच्या प्रतिष्ठेची झाली आहे. यांची भिस्त अब कि बार …. व नरेंद्र मोदी यांच्या नावावर आहे.
भाऊसाहेब वाकचौरे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार आहे.त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली होती. उबाठा शिवसेनेच्या हट्टामुळेच उत्कर्षा रुपवतें यांना उमेदवारी मिळू शकली नाही. भाऊसाहेब वाकचौरे यांची खासदारकीच्या काळात केलेल्या कामावर भिस्त आहे. तरीही कार्यकर्ते उमेदवाराला हात मोकळा नाही म्हणून नाराज आहे.
एकूणच उत्कर्षा रूपवतेच्या कार्यकर्ता मेळावा व अर्ज दाखल करण्यासाठीचा दोन तीन किमी पदयात्रा हि या उमेदवाराला मोठ्या पक्षांच्या रांगेत नेवून बसवण्यासाठी पुरेशी आहे. हा उत्साह ,जोश व सक्रियता मतदानापर्यंत टिकविण्यात रूपवतेंना यश आले तर सत्तेची चावी त्यांच्या हाती असेल असे चित्र आज तरी आहे.