शिवरायांचे संस्कार गीत चित्रपट- शिवभक्त गीत- डॉ. चंद्रशेखर जोशी, गायिका-कार्तिकी गायकवाड, संगीत- चंद्रमोहन
योगीराज शिवराय नाव तव, सर्व धर्म समभाव रयतेचा जाणता हा राजा, त्रिभुवनी त्याचे नाव || धृ ||
कोरस- शिवरायांना मी करीतो मुजरा, शिवरायांना करीतो मुजरा. (२ वेळा) माय जिजाऊ वाढवी ज्यासी सद्गुणांचीच खाण स्वप्न रयतेच्या कल्याणाचे हिंदू स्वराज्याची आण स्वराज्याचे हे स्वप्न पाहुनी लढला हा सरदार गनिमी कावा मनी धरुनी अवचित करी प्रहार अन्यायावर घाव घालण्या लढला हा सरदार प्रसन्न होऊनी आई तुजला, देई भवानी तलवार || १ ||
कोरस- शिवरायांना मी करीतो मुजरा, शिवरायांना करीतो मुजरा. (२ वेळा)
शिवबा तुझिया रयती होई, नारीचा सन्मान इतिहासाच्या पानोपानी शिवबाचे गुणगान || महाराष्ट्राचा गर्व असे तू, देशाचा अभिमान जगी साऱ्या, पूजती मूर्ती, कीर्ती तुझी महान || अद्भुत युक्तीशक्ती पहाता, शिवबा भासे देव शिवबा शिव हे एकच असती, हे तू ध्यानी ठेव || 2 ||
कोरस- शिवरायांना मी करीतो मुजरा, शिवरायांना करीतो मुजरा. (२ वेळा)
योगीराज शिवराय नाव तव, सर्व धर्म समभाव रयतेचा जाणता हा राजा त्रिभुवनी त्याचे नाव || धृ ||
शिवबाचा जयघोष करा, घ्या शिवधर्माचे नाव, अधर्म जेथे नाश पावती, ते शिवबाचे गाव कोरस- अधर्म जेथे नाश पावती, ते शिवबाचे गाव अधर्म जेथे नाश पावती, ते शिवबाचे गाव