“बिनकामाचे टॅबू”
मी स्वतः या व्हिडिओचं समर्थन करतो. असं चांगलं काही डोळे उघडणार असलं कि समाज जिवंत आहे . जागा आहे . याची जाणीव होते . हजारो पिढ्या फाजील अलिखित नियमात बांधल्या गेले आहेत . कधी तरी डोळस व्हावं आणि स्वतः च्या डोक्याला विचार करायला भाग पाडाव हे खरं जीवन आहे . असं मी मानतो .
समाजात एखाद्या गोष्टीभोवती एवढा बागुलबुवा उभा केला जातो की त्याकडे सर्रास भीतीने, घृणेने, करुणेने किंवा असुयेने पहिलं जातं. एकविसाव्या शतकात आपण असेच झापड लावलेले बैल बनून राहणार आहोत की ही बंधनं तोडणार आहोत?
याचाच उहापोह करणारा शब्दभ्रमंतीचा पुढचा व्हिडिओ