झहीर खान यांनी सपत्नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले
भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू झहीर खान यांनी सपत्नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानचे वतीने मंदीर प्रमुख विष्णु थोरात व जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके यांनी त्यांचा शाल व श्री साई मुर्ती देवून सत्कार केला. यावेळी श्री साईबाबा संस्थानचे संरक्षण अधिकारी रोहीदास माळी उपस्थित होते.
झहीर खान हे मूळचे श्रीरामपूर येथील रहिवासी होते. त्यांचे बालपण ही श्रीरामपूर येथेच गेले आहे. या दरम्यान ते परिसरात पुणतांबा , हरेगाव , राहुरी , कोपरगाव ,येवला , मनमाड येथे शेकडो क्रिकेट सामने खेळायला येत असत. त्यावेळच्या मित्राना आजही ते विसरलेले नाही.