तर्कहीन सनदी हटवाद
साईबाबा संस्थान देवस्थानाचा कारभार राजकारण्यांच्या हस्तक्षेपात गेला आणि वादातीत झाला. आजमितीला साईबाबा संस्थानच्या कार्यपद्धती व कारभारावर मा .खंडपीठ , मा. सर्वोच्च न्यायालय यात जे दावे दाखल झाले ते सर्व राजकीय हस्तक्षेपाचा परिणाम आहे . गेल्या दशकापासून साईबाबा संस्थानावरच्या राजकीय नियुक्त्या या आव्हानीत ठरल्या आहे. परिणामी आज साईबाबा संस्थानचा कारभार हा मा . खंडपीठाच्या त्रिसदस्य समिती कडे आहे .यात जिल्हा प्रधान न्यायाधीश ,जिल्हाधिकारी व साईबाबा संस्थांनचे मुख्यकार्यकारी अधिकारी हे कार्यरत आहेत . असे असूनही महसुली मनमानी हि अनुभवास येते . अशावेळी याला चाप कुणी लावायचा हा प्रश्न उभा ठाकला आहे .
मा. न्यायालयाची समिती संस्थान कारभाराची देखरेख करीत आहे म्हणून मुद्दाम उपस्थित करावे असे काही प्रश्न आहे. यावर समिती किती गंभीर आहे याच उत्तर पत्रकार परिषद घेऊन द्यावं अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे नक्कीच नाही .अलीकडे साईबाबा संस्थानात नवे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी पी सीवा शंकर नावाचे हजर झाले. त्यांनी सामान्य दर्शन रांगेतून दर्शन घेतले याच कवित्व आठवडाभर चालले. त्यांनी कारभारात सुधारणा सुरु केल्या. पण त्यातल्या काही तर रोगापेक्षा इलाज जालीम अशा आहेत. त्यात मंदिर परिसरात चप्पल आणायची नाही हा फतवा जारी केला. याला श्रद्धेची झालर लावली. पण यासाठी संस्थानची व्यवस्था पुरेशी आहे का हे कोण तपासणार ? शेकडो भाविकांना चप्पल कुठे ठेवली हेच कळत नाही .परिणामी ती सोडून जावी लागते . यावर उपाय काय आहे ? यासाहेबांची चप्पल पोलीस बंदोबस्तात असते. यावर साहेब काही बोलतील का ? हे व्हिडीओ ,फोटो पहा.हेच तुम्हाला वास्तविकता दाखवतील .
या सीईओ साहेबानी ज्या श्रद्धेची झालर लावत भाविकांना अनवाणी फिरवण्याचा हट्ट धरला ते साहेब पूर्वी द्वारकामाई समोर प्रसाद लाडू मिळत होते तिथे चप्पल ठेवण्याची व्यवस्था करून आपली श्रद्धा जपत आहे.

महसुली संस्काराचा फाजील हटवाद म्हटलं तर वाईट वाटून घेऊ नका .कामात व्यस्त असल्याने सीईओ यांना फोन घ्यायला वेळ नाही. मग भाविकांनी आपल्या अडचणी कुणाला व कश्या सांगायच्या ? सनदी अधिकारी हे व्हीव्हीआयपीचे दर्शनाचे फोटो सेन्सॉर करणे ,पत्रकारांना मज्जाव करणे , चप्पल परिसराबाहेर काढायला लावणे यासाठी श्रद्धेचा तर्क देत आपली प्रतिष्ठा पणाला लावत असतील तर त्यांनी हे लक्ष्यात घेतले पाहिजे कि साईबाबा हे संपूर्ण शिर्डीत वावरत होते. अवघी शिर्डी त्यांच्या पदस्पर्शाची आहे. लाईव्ह दर्शन सुरु असते .आणि हे सीईओ साहेब येण्याच्या आधी जी जीवन पद्धती होती,हे बदलून गेल्यावरही पूर्ववत होणार आहे .भाविक हे चप्पल घालून तसेहि मंदिर परिसरात कधीच येत नव्हतेच. मग कसला अठ्ठाहास ? तुम्ही व्ही व्ही आय पी व त्यांचे सोबतचा फौजफाटा आपल्या नियमात बसवू शकत नाही. मग सामान्य भाविकांची शे दोनशे रुपयांची चप्पल बेवारस सोडायला भाग पाडणे ,किंवा त्याला ती पुन्हा घेण्यासाठी पायपीट करायला लावणे हा कुठला तर्कसंगत निर्णय आहे. हे त्यांचं त्यांनीच ठरवावं. संस्थानचा भक्ताभिमुख विकास , सोयी सुविधा याकडे कोण लक्ष देणार हा हि प्रश्न आहेच .यांच्या या करारी निर्णयाने एका वीज कर्मचाऱ्याला विजेचा शॉक लागला.तरीही समितीचे दोन सदस्य मौन असतील तर संस्थांनfचा कारभार साई भरोसे आहे असेच म्हणावे लागले
अशा धाडसी सीईओ साठी साईबाबा संस्थानांत खूप काम आहेत. त्यांनी वीज विभागात जी चोरी झाली होती. त्याची भरपाई करून घेण्यासाठी ठाम भूमिका घ्यावी. संस्थानच्या आरोग्य सेवेत डॉक्टर टिकत नाही. त्यावर पर्याय म्हणून साईबाबा संस्थानच मेडिकल कॉलेज सुरु करावं. त्यासाठी आपली शक्ती पणाला लावावी .संस्थानात सुरु असलेला बेकायदा इन्सोर्स, औटसोर्स कंत्राटी कारभार संपुष्टात आणण्यासाठी आपल्या अधिकाराचा वापर करावा. शैक्षणिक पात्रता ,अहर्ता नसलेले अधिकारी याना पूर्वपदावर बसवावं. संस्थानची वेबसाईट व्यवस्थित चालत नाही. रेल्वे स्थानक ते भक्त निवास मोफत बस सेवा सुरु करावी. अशी खूप मोठी यादी आहे. जे त्यांना करण्यासारखं आहे .
पण तूर्तास श्रावण संपत आलाय भाद्रपद सुरु होणार आहे .चारही गेट बाहेर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा , भाविकांवर खूप उपकार होतील.


[…] तर्कहीन सनदी हटवाद […]