संस्थान प्रशासनाला जाग आली …
साईबाबांच्या चरणी नतमस्तक दिवसाकाठी अर्धा लाख भाविक येतात. यांचे सोयी सुविधेकरिता काम चांगले व्हावे यासाठी अलीकडच्या दशकात इथे मा .सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने सनदी अधिकारी मुख्य कार्यकारी पदी नेमण्यात आले आहे. ज्या उद्द्येशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याकडे या सनदी अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यांच्या वर्तनात त्यांचा “अहंम “ या धार्मिक संस्थेतही स्पष्ट दिसून येतो.परिणामी भाविक व प्रशासन यांचा संपर्कच नाही .असे म्हटले तरी चालू शकते. आपल्या देवस्थानात आलेल्या व्ही व्ही आय पीची जशी काळजी हे घेतात तशीच सामान्य भाविकांची घेणे अपेक्षित आहे .हि फार माफक अपेक्षा आहे .
असो , https://teatimenews.click/saibaba-sansthan-shirdi-need-to-take-action/
काल TEATIMENEWS ने भाविकांना परिरसत पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे याकडे साईबाबा संस्थांनचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. त्याला चोवीस तासात प्रतिसाद देत. साईबाबा संस्थानच्या गेट नंबर चार व तीन च्या बाहेरील भागात पिण्याचे पाणी उपलबध करून दिले. त्याबद्दल या व्यवस्थेला धन्यवाद. वास्तविक पाहता चार हि गेट बाहेर कुलर लावून थंड पाण्याची अविरत सेवा साईबाबा संस्थान करावी म्हणजे भाविकांची सोय होईल.

